दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ICU मध्ये; ऑक्सिजन पातळी खालवली
By ravalnath.patil | Published: September 24, 2020 10:53 AM2020-09-24T10:53:58+5:302020-09-24T10:57:38+5:30
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना 14 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती.
नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना बुधवारी लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी मनीष सिसोदिया यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर ते होम क्वारंटाइन होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम आदमी पार्टीचे 48 वर्षीय नेते मनीष सिसोदिया यांच्या शरीरातून ऑक्सिजनचा स्तर कमी झाला झाल्यामुळे आणि ताप असल्याने बुधवारी सायंकाळी साधारण चार वाजता त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.
मनीष सिसोदिया यांना अधिक तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरातील तापमान वाढत होते. तसेच, ऑक्सिजनचा स्तरही थोडा कमी झाला होता, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. मनीष सिसोदिया यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, गरज पडल्यास ऑक्सिजन दिले जाऊ शकते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना 14 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते होम क्वारंटाइन होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे मनीष सिसोदिया हे 14 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच्या एक दिवसीय सत्रात सहभागी होऊ शकले नाहीत. बुधवारी त्यांनी ट्विट करीत कोंडलीचे आमदार कुलदीप कुमार यांच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
आणखी बातम्या..
- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?
- सुरेश अंगडी यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
- बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज
- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो
- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी