उपजिल्हाधिकारी संगिता कनौजियांचे निधन, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 06:26 PM2022-09-08T18:26:41+5:302022-09-08T18:27:29+5:30
हरीद्वार जिल्ह्यातील लक्सर येथे संगिता कनौजिया उपजिल्हाधिकारी पदावर कर्तव्यावर होत्या
ऋषिकेश - उत्तर प्रदेशच्या लक्सर येथील रुडकी मार्गावर २६ एप्रिल रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात उपजिल्हाधिकारी संगिता कनौजिया यांच्या गाडीला धडक बसली. त्यामध्ये, संगीत या गंभीर जखमी झाल्या होत्या तर कारचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर अवस्थेत असलेल्या संगिता यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अखेर मृत्युशी सुरू असलेली त्यांची झुंज आज संपली. संगिता कनौजिया यांनी आज रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
हरीद्वार जिल्ह्यातील लक्सर येथे संगिता कनौजिया उपजिल्हाधिकारी पदावर कर्तव्यावर होत्या. गेल्या ५ महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, आज त्यांनी रुग्णालयातच जीव सोडला. ऋषिकेशचे उपजिल्हाधिकारी शैलेंद्र सिंह नेगी यांनी ही दु:खद बातमी दिली. २६ एप्रिल रोजी अपघात झाल्यानंतर संगिता यांना रुडकी येथील विनय विशाल नर्सिंग होममध्ये तात्काळ दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आले. मात्र, रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.