पोलीस उपायुक्त चावरिया आणि साकोरेंनी स्विकारला पदभार
By admin | Published: May 22, 2015 12:25 AM2015-05-22T00:25:09+5:302015-05-22T00:25:09+5:30
फोटो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये साकोरे आणि चावरिया नावाने
Next
फ टो आहे : लक्ष्मण लॉगिनमध्ये साकोरे आणि चावरिया नावानेपुणे : पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिका-यांच्या राज्य शासनाने नुकत्याच बदल्या जाहीर केल्या आहेत. बदल्यांच्या ठिकाणी अधिकारी हजर होऊ लागले असून बुधवारी संध्याकाळी उपायुक्त अरविंद चावरिया आणि दीपक साकोरे यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये पदभार स्विकारला. चावरिया आणि साकोरे हे दोघेही १९९६ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. चावरिया यांच्याकडे मुख्यालय (२) तर साकोरे यांच्याकडे आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचा पदभार सोपवण्यात आला आहे.चावरिया मुळचे जळगावचे आहेत. त्यांनी सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सोलापूरमध्येच उपअधीक्षकपदी काम केले. त्यानंतर औरंगाबाद ग्रामीणमधील सिल्लोडचे उपअधीक्षकपदी त्यांची नेमणूक झाली. राज्य राखीव दलाचे कमांडंट (जालना), नवी मुंबई येथील मरोळ पोलीस प्रशिक्षन केंद्राचे उपप्राचार्य, परभणीचे अतिरीक्त अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीणचे अतिरीक्त अधीक्षक, बुलढाण्याचे अतिरीक्त अधीक्षक अशा जबाबदा-या पार पाडल्या आहेत. ते सध्या औरंगाबाद पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडल दोनचे उपायुक्त म्हणून काम करीत होते. औरंगाबादहून त्यांची बदली पुण्याला झाली आहे. तर साकोरे यांनी यवतमाळ जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर धुळे, बार्शी (सोलापूर), इचलकरंजी येथे उपअधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर नवी मुंबईमध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले. त्यानंतर ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये अतिरीक्त अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोकण विभागाचे अधीक्षक म्हणून त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय ठरले. साकोरे सध्या औरंगाबाद येथील भारत राखीव बटालियन (आयआरबी) चे कमांडंट म्हणून काम करीत होते. तेथून त्यांची पुण्याला बदली करण्यात आली आहे. साकोरे यांच्याकडे गुन्हे शाखेच्या आर्थिक आणि सायबर शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.