डेप्युटी मॅनेजरनेच घडविला १३,५00 कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:53 AM2018-06-27T05:53:53+5:302018-06-27T05:54:21+5:30

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १३,५00 कोटी रुपयांचा महाघोटाळा बँकेच्या एका कर्मचाऱ्याने घडवून आणल्याचे पीएनबीने केलेल्या अंतर्गत चौकशीत समोर आले आहे.

Deputy Managing Director created a scam of Rs 13,500 crore | डेप्युटी मॅनेजरनेच घडविला १३,५00 कोटींचा घोटाळा

डेप्युटी मॅनेजरनेच घडविला १३,५00 कोटींचा घोटाळा

Next

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १३,५00 कोटी रुपयांचा महाघोटाळा बँकेच्या एका कर्मचाऱ्याने घडवून आणल्याचे पीएनबीने केलेल्या अंतर्गत चौकशीत समोर आले आहे. या घोटाळ्याने भारतीय बँक व्यवस्थेतील कमजोर दुवेही समोर आणले आहेत.
ब्रॅडी हाउस शाखेत हा घोटाळा झाला. डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी याने घोटाळा घडवून आणल्याचे तपासातून समोर आले. शेट्टी याला १0 ते २५ लाखांचे रोख व्यवहार, तसेच हस्तांतरास मंजुरी देण्याचे अधिकार होते, पण २0१0 ते २0१७ या काळात त्याने १ कोटी व अधिक जास्त रकमेचे १३,५0१ व्यवहार मंजूर केले. त्याने मंजूर केलेला सर्वाधिक मोठा व्यवहार जून २0१५ मधील २१२ कोटी रुपयांचा होता.
शेट्टीचा बँकेच्या सॉफ्टवेअरशी संपर्क होता. स्वत:च्या व्यवहारांची पडताळणीही त्याने स्वत:च केली. त्यामुळे हे व्यवहार उघडकीस आले नाहीत. २0१७ मध्ये निदर्शनास आले होते की, व्यवहारांची नोंद व नोंदीची तपासणी करणे, अशी दोन्ही कामे तो स्वत:च करीत होता. तपासणीचे काम त्याच्याऐवजी दुसºया कर्मचाºयाकडे असते, तर त्याचा घोटाळा लगेच उघडकीस आला असता.

शेट्टीने बँकेच्या दिल्ली मुख्यालयास नियमित कामकाजाच्या वेळेच्या आधीच सकाळी ८ ते ९.३0 या वेळेत वित्तीय व्यवहारांशी संबंधित ३५ ईमेल पाठविले. यातील २२ ईमेल नीरव मोदीच्या व्यवहाराचे आहेत. या ईमेलसाठी त्याने खासगी ईमेल आयडीचा वापर केला. शेट्टीला त्याच्या वरिष्ठांचाही वरदहस्त होता. त्यामुळे त्याच्या बदल्या तीन वेळा रद्द करण्यात आल्या होत्या. तो सात वर्षे एकाच शाखेत एकच काम करीत राहिला.

Web Title: Deputy Managing Director created a scam of Rs 13,500 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.