मिस्टर डेरेक ओ ब्रायन, ताबडतोब...; बोट दाखवत धनखड बरसले अन् सस्पेंड केलं! राज्यसभेत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 14:55 IST2023-12-14T14:54:40+5:302023-12-14T14:55:33+5:30
तत्पूर्वी, आज 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली. विरोधी पक्षांचे काही सदस्य वेलमध्ये आले. धनखड यांनी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढतच गेला.

मिस्टर डेरेक ओ ब्रायन, ताबडतोब...; बोट दाखवत धनखड बरसले अन् सस्पेंड केलं! राज्यसभेत नेमकं काय घडलं?
मी डेरेक ओ ब्रायन यांचे नाव घेत आहे. मिस्टर डेरेक ओ ब्रायन, ताबडतोब सभागृह सोडा... असे म्हणत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड रागाने उभे राहिले आणि म्हणाले, 'आपण काय करत आहात? मिस्टर डेरेक ओ ब्रायन आपण विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे. मिस्टर डेरेक ओ ब्रायन, ताबडतोब सभागृहातून बाहेर जा.'
तत्पूर्वी, आज 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली. विरोधी पक्षांचे काही सदस्य वेलमध्ये आले. धनखड यांनी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढतच गेला. अखेर सभापती भडकले आणि बोट दाखवत उभे राहिले. काल लोकसभेत झालेल्या सुरक्षेतील चुकीसंदर्भात चर्चा करण्याची विरोधी पक्षांच्या सदस्यांची इच्छा होती.
यानंतर, काही वेळातच सभापती धनखड यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन (Derek O Brien Suspend) यांना या सत्राच्या उरलेल्या कालावधीसाठी सस्पेंड केले. त्यांच्यावर, राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. यावर सभापती म्हणाले, ते वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत राहिले. त्यांनी खुर्चीचा अपमान केला.
डेरेक यांनी नेमके काय केले? -
यापूर्वी विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे काही बोलायला लागले, तेवढ्यात सभापती म्हणाले, संसदेतील सदस्य असे करत आहे, आपण याची कल्पना करू शकता? हा लाजीरवाणा प्रकार आहे. मात्र, सभापती नेमके कशामुळे एवढे संतापले, हे स्पष्ट झालेले नाही. वेलमध्ये डेरेक घोषणाबाजी करताना दिसून आले. ते दोन्ही हातांनी इशारा करत बोलत होते. सभापती म्हणाले माझी मान शर्मेने झुकली. काही तरी (ऐक्शन) व्हायला हवे. काही सदस्यांना सवयच झाली आहे. आपण याला परवानगी द्याल का? असे म्हणताना धनखड यांचा इशारा खर्गेंकडे होता.
तत्काळ चेम्बरमध्ये बोलावलं अन्... -
शेवटी, हे प्रकरण मी अत्यंत गांभीर्याने घेतले आहे, असे म्हणत धनखड यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित करत विरोधी पक्षाचे नेते आणि सभागृह नेते यांना ताबडतोब (10 मिनिटांच्या आत) आपल्या चेम्बरमध्ये बोलावले. सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले. याच पद्धतीने आज लोकसभेतही गदारोळ दिसून आला. यानंतर लोकसभेचे कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. येथेही विरोधी पक्षाचे नेते सुरक्षिततेसंदर्भात चर्चेची मागणी करत होते.