गोव्याचे वंशज अंतोनियो होणार पोर्तुगालचे पंतप्रधान

By admin | Published: November 10, 2015 10:51 PM2015-11-10T22:51:24+5:302015-11-10T22:51:24+5:30

पोर्तुगालमध्ये गोव्याचे ‘बाबुश’ आंतोनियो कोस्ता यांनी दहा दिवसात सरकारची उलथापालथ घडवली असून ते आता पोर्तुगालचे पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत.

The descendants of Goa will be Antonio, the Prime Minister of Portugal | गोव्याचे वंशज अंतोनियो होणार पोर्तुगालचे पंतप्रधान

गोव्याचे वंशज अंतोनियो होणार पोर्तुगालचे पंतप्रधान

Next

पणजी : पोर्तुगालमध्ये गोव्याचे ‘बाबुश’ आंतोनियो कोस्ता यांनी दहा दिवसात सरकारची उलथापालथ घडवली असून ते आता पोर्तुगालचे पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत.
मडगाव येथील गोमंतकीय कवी ओर्लांदो कोस्ता यांचे सुपुत्र आंतोनियो (वय ५४) यांनी पोर्तुगालमध्ये डावे व हरित पक्षांशी हातमिळवणी केली आहे. २३0 सदस्यीय पोर्तुगाल संसदेत पेद्रु पासोस कुएलो यांना बहुमत नसतानाही ३0 आॅक्टोबर रोजी पंतप्रधानपद प्राप्त झाले होते. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला १0७ जागा मिळाल्या होत्या; मात्र बहुमतासाठी आवश्यक आणखी ९ जणांना ते आणू शकले नाहीत. याचा फायदा कोस्ता यांच्या सोशालिस्ट पार्टीने (पीएस) घेतला आणि डावे तसेच हरित पक्षांशी हातमिळवणी करून १२२चे बहुमत गाठले. कोस्ता पंतप्रधान बनल्यानंतर त्यांच्यासमोर मुख्य आव्हान पोर्तुगालला आर्थिक संकटातून बाहेर काढणे हेच असणार आहे. कोस्ता यांचे मडगावमध्ये आब दे फारिया मार्गावर १५0 वर्षे जुने घर आहे. त्यांचे काही नातेवाईक गोव्यात राहतात. याआधी पोर्तुगाल संसदेत पणजीचे नारायण कैसरो हे विरोधी नेते होऊन गेले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The descendants of Goa will be Antonio, the Prime Minister of Portugal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.