विमान प्रवास बंदी असूनही खासदार दिवाकर रेड्डी युरोपला रवाना

By admin | Published: June 17, 2017 01:14 PM2017-06-17T13:14:47+5:302017-06-17T13:14:47+5:30

विमान प्रवास बंदी असतानाही तेलगू देसम पार्टीचे खासदार दिवाकर रेड्डी विमानाने युरोपला रवाना झाले आहेत.

Despite flying ban, MP Diwakar Reddy leaves for Europe | विमान प्रवास बंदी असूनही खासदार दिवाकर रेड्डी युरोपला रवाना

विमान प्रवास बंदी असूनही खासदार दिवाकर रेड्डी युरोपला रवाना

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 17-  विमान प्रवास बंदी असतानाही तेलगू देसम पार्टीचे खासदार दिवाकर रेड्डी विमानाने युरोपला रवाना झाले आहेत. स्थानिक कंपन्यांनी बंदी घातल्यानंतर दिवाकर रेड्डी आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्यांच्या विमानातून युरोपला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रवाना झाले आहेत. याआधी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमानात कर्मचाऱ्याशी वाद घातल्याने त्यांच्यावर विमान प्रवासाची बंदी घातली होती. त्यानंतर ती बंदी उठवण्यात आली. मात्र बंदीच्या काळात त्यांना विमानाने प्रवास करता आला नव्हता. त्यामुळे  शिवसेना खासदाराला एक न्याय आणि टीडीपीला दुसरा न्याय का?, असा सवाल उपस्थित करत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
 
तेलगू देसमचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीसुद्धा केली होती. याप्रकरणी खासदार दिवाकर रेड्डी यांच्यावर स्थानिक विमान कंपन्यांनी बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. विशाखापट्टणम विमानतळावर केलेल्या गोंधळामुळे रेड्डी यांच्याविरोधात स्थानिक विमान कंपन्यांनी हे पाऊल उचललं. या घटनेनंतर गुरूवारी रात्री उशीरा इंडिगोने रेड्डी यांना त्यांच्या एअरलाईन्समधून प्रवास करण्यावर बंदी टाकली होती. त्यानंतर  विस्तारा, बजेट एअरलाईन्स, गोवा एअर आणि एअरएशिया इंडिया या कंपन्यांनी शुक्रवारी दिवाकर रेड्डी यांच्यावर विमान प्रवासाची बंदी आणण्याचा घेतला. तर एअर इंडिया, स्पाइस जेट आणि जेट एअरवेज या कंपन्यानी गुरूवारी खासदार रेड्डी यांच्यावर प्रवास बंदी आणली आहे.
 
नेमकं प्रकरण काय ?
खासदार दिवाकर रेड्डी हे गुरुवारी विशाखापट्टणम विमानतळावर गेले होते. इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने ते हैदराबादला जाणार होते. रेड्डी विमानतळावर आले त्यावेळी विमानासाठी चेक इन बंद झालं होतं. विमानाच्या टेक-ऑफला अर्धा तासापेक्षा कमी वेळ असताना रेड्डी आले. अशा स्थितीत त्यांना प्रवेश देणं शक्य नव्हतं. विमानात प्रवेश मिळत नाही हे बघून दिवाकर रेड्डी संतापले. त्यांनी विमानतळावरील इंडिगोच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. त्यांनी फर्निचर आणि प्रिंटरची तोडफोड केल्याची माहिती आहे. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीदेखील केली. धक्काबुक्कीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातदेखील कैद झाली आहे.
 
 

Web Title: Despite flying ban, MP Diwakar Reddy leaves for Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.