लसीकरणासाठी सरकारचे प्रयत्न तरी लोक उदासीन; ६० टक्के लोकांना लसीची घाई नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:13 AM2021-01-02T01:13:53+5:302021-01-02T01:14:07+5:30
६० टक्के लोकांना लसीची घाई नाही
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कोरोना विषाणूला राेखण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोठी योजना बनवली असली तरी लोकांचा तेवढा प्रतिसाद नाही.ऑनलाईन प्लॅटफॉर्म लोकल पाहणीत ६० टक्के लोकांनी स्पष्ट केले की, आम्ही कोरोना लस घेण्याची घाई करणार नाही. पाहणीत सहभागी २६२ जिल्ह्यांतील जवळपास २५ हजार लोकांपैकी जवळपास १५ हजार जण जर येत्या दोन महिन्यांत लस उपलब्ध झाली तरी ती घेण्यास प्राधान्य देणार नाहीत. येथील सफदरजंग रुग्णालयाच्या भगवान महावीर मेडिकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसन विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. जुगल किशोर यांच्या देखरेखीत झालेल्या दुसऱ्या एका पाहणीचे निष्कर्षही मिळतेजुळते आहेत.
डॉ. जुगल किशोर यांनी‘लोकमत’ ला सांगितले की, पाहणीत ४० टक्के लोक त्यांच्या मुलांना सध्याच लस देण्यास तयार नाहीत. २९ टक्क्यांपेक्षा जास्त लोक स्वत: लस घेण्यास तयार नाहीत. ते म्हणाले, एखादी लस इतक्या कमी वेळेत तयार होण्याची ही पहिली वेळ आहे. खूपच मर्यादित वेळेत व मर्यादित शोधाच्या आधारावर लसीला मंजुरी मिळाल्यामुळे तिच्या विश्वासार्हता लोकांचा विश्वास नाही.
अखिल भारत हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी म्हटले की, सरकारने हे स्पष्ट करावे की, लसीत गायीचे रक्त वापरले का किंवा हिंदू सनातन धर्माच्या भावनांना तडा जाईल अशा तत्वाचा वापर केला गेला आहे का? याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.