सरन्यायाधीश रंजन गोगोईंची 'प्रॉपर्टी' पाहून आश्चर्याचा धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 12:43 PM2018-10-03T12:43:17+5:302018-10-03T12:49:20+5:30
न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
नवी दिल्ली- न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली आहे. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीशपदी रंजन गोगोई यांनी शपथ घेतली आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत. परंतु सरन्यायाधीश यांच्याकडील संपत्तीसंदर्भातील माहिती आता समोर आली आहे. न्यायाधीशांचा पगार वाढला पाहिजे, असं जेव्हा अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले होते. सरन्यायाधीशांनी दाखल केलेल्या शपथपत्रावरूनच के. के. वेणुगोपाल यांनी असं विधान केलं असावं. खास करून निवृत्त सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची संपत्ती पाहून ते असे म्हणाले असावेत.
- 2001मध्ये हायकोर्टात झाले होते न्यायाधीश
माजी न्यायाधीश दीपक मिस्रा हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले आहेत. जवळपास 14 वर्षं ते वेगवेगळ्या उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिले आहेत. न्यायाधीश गोगोई 28 फेब्रुवारी 2001मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश बनले होते. 23 एप्रिल 2012मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली.
- मोठ्या वकिलांच्या एक दिवसाच्या कमाईपेक्षा कमी आहे संपत्ती
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कर्तव्य बजावूनही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची संपत्ती फार कमी आहे. वरिष्ठ न्यायाधीशांच्या संपत्तीच्या तुलनेत त्यांची संपत्ती काहीही नाही. विशेष म्हणजे त्यांच्या बँकेतील रक्कम आणि इतर संपत्ती एकत्र करूनही इतर वकिलांच्या एक दिवसाच्या कमाईपेक्षाही कमी आहे.
- सरन्यायाधीशांकडे सोनं नाही, कोणतीही कार नाही
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे सोन्याचे दागिने नाहीत, तसेच त्यांच्या पत्नीजवळ जे काही दागिने आहेत, ते त्यांच्या लग्नावेळी आई-वडील, नातेवाईक आणि मित्रांकडून देण्यात आले होते. तर दीपक मिस्रा यांच्याकडे 2 अंगठ्या ज्या ते घालतात. तसेच त्यांच्याजवळ सोन्याची चेन आहे. दीपक मिस्रांच्या पत्नीकडे न्यायाधीश गोगोईंच्या पत्नीच्या तुलनेत जास्त दागिने आहेत. न्यायाधीश मिस्रा आणि न्यायाधीश गोगोई या दोघांकडेही स्वतःची खासगी गाडी नाही. त्यांच्याकडे सरकारी गाडी आहे.
- सरन्यायाधीश गोगोईंकडे घर नाही, तर निवृत्त न्यायाधीश दीपक मिस्रांकडे एक फ्लॅट
सरन्यायाधीश गोगोईंवर कोणतंही कर्ज नाही. माजी न्यायाधीश दीपक मिस्रांकडे दिल्लीतल्या मयुर विहार इथे एक 22.5 लाखांचा कर्जावर घेतलेला फ्लॅट आहे. मिस्रा यांच्याकडे कटकमध्येही एक घर आहे, जे त्यांनी सरन्यायाधीश बनण्याच्या आधी घेतलं होतं. न्यायाधीश मिस्रा आणि सरन्यायाधीश गोगोई यांनी 2012मध्ये स्वतःची संपत्ती जाहीर केली होती.
- सरन्यायाधीश गोगोई आणि पत्नीजवळ फक्त 30 लाख रुपयांचा बँक बॅलन्स
एलआयसी पॉलिसीसह सरन्यायाधीश गोगोई आणि त्यांची पत्नी यांच्याकडे 30 लाख रुपयांचं बँक बॅलन्स आहे. गुवाहाटीतल्या बेलटोलामध्ये उच्च न्यायालयात न्यायाधीश बनण्यासाठी 1999मध्ये त्यांनी एक प्लॉट खरेदी केला आहे. दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी तो प्लॉट 65 लाखांना विकला होता. तसेच त्यांनी खरेदीदाराचं नावही जाहीर केलं आहे.
- वकिलांची एक दिवसाची कमाई 50 लाख रुपयांपेक्षा जास्त
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील हे एका दिवसासाठी 50 लाखांहून जास्त कमावतात. त्यामुळेच के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या उल्लेख केला आहे.