नियतीचा उलटफेर! इकडे बहिष्कार टाकला, तिकडे चीनमध्ये भारतीय मालाची मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 03:34 PM2020-08-22T15:34:50+5:302020-08-22T15:36:37+5:30

गलवान घाटीतील घटनेनंतर संपूर्ण देशात #BoycottChina ची मोहिम सुरु झाली आणि चीनच्या उत्पादनांची मागणी घटली. रेल्वे, बीएसएनएल, हायवे सारख्या सरकारी प्रकल्पांनी चीनसोबतचे कोट्यवधींचे करार मोडून काढले.

destiny! Indians boycotted, huge demand of Indian goods in China | नियतीचा उलटफेर! इकडे बहिष्कार टाकला, तिकडे चीनमध्ये भारतीय मालाची मागणी वाढली

नियतीचा उलटफेर! इकडे बहिष्कार टाकला, तिकडे चीनमध्ये भारतीय मालाची मागणी वाढली

googlenewsNext

गेल्या काही वर्षांपासून भारतीयचीनमधून मोठमोठे कंटेनर भरून साहित्य आयात करत होते. एवढे की घरातील साऱ्या वस्तूच चिनी बनावटीच्या होत्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू, मुलांची खेळणी आदी सारे काही चिनी होते. आज कोरोनाने हे पारडेच पालटले आहे. गलवान घाटीतील घटनेनंतर संपूर्ण देशात #BoycottChina ची मोहिम सुरु झाली आणि चीनच्या उत्पादनांची मागणी घटली. रेल्वे, बीएसएनएल, हायवे सारख्या सरकारी प्रकल्पांनी चीनसोबतचे कोट्यवधींचे करार मोडून काढले. याचबरोबर सरकारने 371 चिनी उत्पादनांवर हळूहळू बंदी आणण्यास सुरुवात केली आहे. यावर कामही केले जात आहे. 


आता चीन भारतीय उत्पादनांची आयात करू लागला आहे. भारताने आयात घटविली असली तरीही निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार जूनमध्ये चीनला निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये थोडी थोडकी नव्हे तर 78 टक्क्यांची वाढ झाली आहे. चीनने कोरोनावर ताबा मिळविला असल्याने तिथे भारतीय वस्तूंची मागणी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. 


जुलै महिन्यामध्येही भारतीय वस्तूंना मोठी मागणी राहिलेली आहे. चीनमध्ये 78 टक्के, मलेशियामध्ये 76 टक्के, व्हिएतनाम, सिंगापूरमध्ये 37 टकक्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. अमेरिका, इग्लंड, ब्राझीलसह युरोपियन देश आताही कोरोना संकटाशी सामना करत आहेत. यामुळे तिथे केली जाणारी निर्यात घटली आहे. UAE साठी निर्यात 53.2%, ब्रिटन 38.8%, अमेरिका 11.2% आणि ब्राझीलसाठी 6.3% घट झाली आहे. 


भारतातून केल्या जाणाऱ्या निर्यातीमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी सुधारणा झाली आहे. एप्रिलच्या महिन्यात दरवर्षीची सरासरी उणे 60.2 टक्के होती. मेमध्ये ती घटून उणे 50 टक्के झाली होती. तर जूनमध्ये उणे 30 टक्के आणि जुलैमध्ये उणे  10.2 टक्क्यांवर आली आहे. 

स्वदेशीची संकल्पना काय होती? कोणी पहिले बलिदान दिले...जाणून घ्या...

साधारणपणे 1930च्या सुमारास भारतीय कारखानदारी वाढू लागली होती. मात्र, इंग्रज या कारखानदारांना अडथळा निर्माण करत होते. यामुळे या कारखानदारांनी काँग्रेसच्या स्वदेशी आंदोलनाला पाठींबा दिला होता. 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबई येथे परदेशी कपड्यांचा मालवाहू ट्रक अडविण्यासाठी बाबू गेनू ट्रकसमोर आडवे झाले. ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. यात त्यांना हौतात्म्य आले. ते स्वदेशी आंदोलनातील पहिले हुतात्मा ठरले. हा दिवस आजही स्वदेशी दिवस म्हणून पाळला जातो. बाबू गेनू हे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींच्या स्वदेशी आणि बहिष्कार आंदोलनाने प्रेरित झाले होते. 
महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनात बाबू गेनू जेल मध्येही गेले होते. ऑक्टोबर 1930 मध्ये सुटल्यानंतर, त्यांनी घरो-घरी जाऊन स्वदेशीच्या प्रचाराला सुरुवात केली. 1930 च्या दिवाळीनंतर परदेशी मालाच्या बहिष्काराचे आंदोलन संपूर्ण देशात पसरले होते. बाबू गेनू यांनी सर्व स्वयंसेवकांच्या साथीने परदेशी वस्तूंचा ट्रक अडविण्याचे ठरवले होते. अखेर 12 डिसेंबर 1930ला मुंबईतील कालादेवी रोडवर सत्याग्रह करण्याचे ठरले. यातच बाबू गेनू यांना होतात्म्य आले.

टिळकांची 'स्वदेशी'ची कल्पना काय होती?
इंग्रजी सत्तेविरोधात स्वदेशीच्या घोषणेलाच शस्त्र बनवणाऱ्यांत लोकमान्य टिळक हे अग्रणी होते. इंग्रजी सत्तेविरोधात लढत स्वराज्य प्राप्तीच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी भारतीयांना स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, असा चतुःसूत्री कार्यक्रम दिला होता. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीत स्वदेशी एवढेच महत्व बहिष्कारालाही होते. त्या वेळी, स्वदेशी आंदोलनाकडे केवळ आर्थिक धोरण म्हणूनच नव्हे, तर स्वराज्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणूनही पाहिले गेले आणि हे लोकमान्यांनी दिलेल्या चतुसूत्रीवरून सहज लक्षात येते. "स्वदेशीचे व्रत ग्राहक निर्माण करते. स्वदेशी हा ईश्वरी आदेश आहे. देशातील उद्योगधंदे वाढवून राष्ट्राच्या संपत्तीत भर टाकणे हाच स्वराज्याचा खरा अर्थ,"असे लोकमान्यांचे मत होते. स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकरांनी केलेली परदेशी कपड्यांची होळी, हे परदेशी वस्तुंवरील बहिष्काराचे जहाल उदाहरण होते. त्याला लोकमान्यांचा पूर्ण पाठिंबा होता. नव्हे त्या कार्यक्रमाला लोकमान्यांची प्रमुख उपस्थितीही होती.

अन्य महत्वाच्या बातम्या...

गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीट

लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज करावा लागणार

धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल

पंजाब बॉर्डरवर BSF ची मोठी कारवाई; पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले

अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा

शिबू सोरेन यांना कोरोना; झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही होणार टेस्ट

सोनू सूदचे 'ते' ट्विटर खाते बनावट; म्हणाला ''लवकरच अटक होणार''

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

Web Title: destiny! Indians boycotted, huge demand of Indian goods in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.