24 मार्चला पूर्वांचल उद्ध्वस्त करू, इसिसची उत्तर प्रदेशला धमकी
By admin | Published: March 22, 2017 05:07 PM2017-03-22T17:07:13+5:302017-03-22T17:41:57+5:30
उत्तर प्रदेश राज्याला इसिसच्या धमकीचं पत्र मिळालं आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 22 - उत्तर प्रदेश राज्याला इसिसच्या धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात 24 मार्चला पूर्वांचल (पूर्व उत्तर प्रदेश) उद्ध्वस्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 24 मार्चला तुम्ही पूर्वांचल म्हणजेच पूर्व उत्तर प्रदेशला वाचवू शकत असल्यास जरूर वाचवा, असंही या पत्रात लिहिलं आहे.
या पत्रावर पाकिस्तान जिंदाबाद असंही लिहिण्यात आलं आहे. या पत्रानंतर उत्तर प्रदेशमधलं पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून, पोलीस या प्रकरणाच्या चौकशीला लागले आहेत. वाराणसीचे एसपी आशिष तिवारी यांनी सांगितलं की, गेल्या रात्री आम्हाला इसिसचं धमकीचं पत्र मिळालं आहे. आम्हाला मिर्जा मुराद या परिसरातून 5 ते 6 पत्र प्राप्त झाली आहेत.
या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत. या पत्रात सर्वात वर लिहिलं आहे, इसिस, पाकिस्तान जिंदाबाद !, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाचा (इसिस) संशयित दहशतवादी सैफुल्लाला कारवाईत एका घरात ठार करण्यात आलं होतं. पोलिसांसोबत सैफुल्लाच्या झालेल्या चकमकीत तो मारला गेला. भोपाळ-उज्जैन पॅसेंजर रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटाशी त्याचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे होतं. त्याच पार्श्वभूमीवर हे पत्र मिळाल्यानं उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Uttar Pradesh: Purported ISIS threat letter recovered from Varanasi, police register case against unknown persons. pic.twitter.com/eOn90cglOm
— ANI UP (@ANINewsUP) March 22, 2017