दोन लाखाचा खवा नष्ट
By admin | Published: October 30, 2016 12:22 AM2016-10-30T00:22:46+5:302016-10-30T00:22:46+5:30
जळगाव: नवीन बसस्थानक व स्टेडियम कॉम्लेक्सध्ये गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आलेला दोन लाख रुपये किमतीचा खवा अन्न व औषध प्रशासन विभागाने शनिवारी निमखेडी शिवारात मनपाच्या कचरा प्रकल्पाजवळ नष्ट केला. जेसीबीद्वारे शोष खड्डा करून त्यात हा खवा पुरण्यात आला. सहायक आयुक्त मिलिंद शहा व अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी २५ ऑक्टोबर रोजी खाण्यास अयोग्य असलेला एक लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा ७६० किलो खवा नवीन बसस्थानकात जप्त केला होता. तर त्याआधी स्टेडियम कॉप्लेक्समध्ये ८० हजार रुपये किमतीचा खवा जप्त केला होता.
Next
ज गाव: नवीन बसस्थानक व स्टेडियम कॉम्लेक्सध्ये गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आलेला दोन लाख रुपये किमतीचा खवा अन्न व औषध प्रशासन विभागाने शनिवारी निमखेडी शिवारात मनपाच्या कचरा प्रकल्पाजवळ नष्ट केला. जेसीबीद्वारे शोष खड्डा करून त्यात हा खवा पुरण्यात आला. सहायक आयुक्त मिलिंद शहा व अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी २५ ऑक्टोबर रोजी खाण्यास अयोग्य असलेला एक लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा ७६० किलो खवा नवीन बसस्थानकात जप्त केला होता. तर त्याआधी स्टेडियम कॉप्लेक्समध्ये ८० हजार रुपये किमतीचा खवा जप्त केला होता.वातानुकुलित यंत्र अथवा वाहनातून वाहतूक केलेला खवा खाण्यास योग्य असतो. बसच्या डिक्कीत व टपावर असलेल्या खव्यात धूर व घाण जात असल्याने आरोग्याच्यादृष्टीने तो खाण्यास अयोग्य असल्याने हा खवा जप्त करण्यात आला होता. खव्याचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यावर मालकावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे शहा यांनी स्पष्ट केले.