पाक नावेदशी संबंधित पुरावे नष्ट करतोय

By admin | Published: August 25, 2015 03:57 AM2015-08-25T03:57:11+5:302015-08-25T03:57:11+5:30

जम्मू आणि काश्मीरमध्ये पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी महंमद नावेद याकूब याच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन बंद करण्यात आले असून नावेदशी संबंधित पुरावे

Destroying evidence related to Pak Niwas | पाक नावेदशी संबंधित पुरावे नष्ट करतोय

पाक नावेदशी संबंधित पुरावे नष्ट करतोय

Next

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी महंमद नावेद याकूब याच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन बंद करण्यात आले असून नावेदशी संबंधित पुरावे पाकिस्तानकडून नाहीसे केले जात आहेत. नावेद पकडला गेल्यानंतर त्याच्या वडिलांशी संपर्क साधण्यात आला होता व त्यांनीही तो माझा मुलगा आहे, असे म्हटले होते. हे संभाषण झाल्यापासूनच त्याच्या वडिलांसह त्याच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन बंद आहेत.
नावेदच्या वडिलांनी तर दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तोयबा’ व पाकिस्तानी लष्कर आम्हाला ठार मारून टाकेल. आमचे सगळे कुटुंबच खूप भ्यालेले आहे, असे बोलून दाखविले होते.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत (२६/११) जिवंत हाती लागलेल्या अजमल कसाबशी संबंधित पुरावे पाकिस्तानने नाहीसे केले होते. कसाबच्या कुटुंबियांना अटक झाली होती. नावेदच्या कुटुंबियांनाही अटक होऊ शकते, असे वृत्तात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Destroying evidence related to Pak Niwas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.