सरकारी बंगल्याची नासधूस हे भाजपाने रचलेले कारस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:34 AM2018-06-14T05:34:54+5:302018-06-14T05:34:54+5:30
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रिकाम्या केलेल्या सरकारी बंगल्यामध्ये नासधूस केल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले होते. हे भाजपाने आपल्याविरुद्ध रचलेले कारस्थान आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
लखनौ - उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रिकाम्या केलेल्या सरकारी बंगल्यामध्ये नासधूस केल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले होते. हे भाजपाने आपल्याविरुद्ध रचलेले कारस्थान आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पोटनिवडणुकांमध्ये लागोपाठ पराभवाला सामोरे जावे लागल्याने उद्विग्न झालेल्या भाजपाने हे कारस्थान रचले आहे.
काही माजी मुख्यमंत्र्यांनी वर्षानुवर्षे लखनौतील सरकारी बंगले ताब्यात ठेवले होते. ते रिकामे करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर अखिलेश, मुलायमसिंग यादव, मायावती यांच्यासह काही माजी मुख्यमंत्र्यांनी त्यानुसार कृतीही केली; परंतु अखिलेश यादव यांनी रिकाम्या केलेल्या बंगल्यात नासधूस झाल्याचे एका व्हीडिओ फितीतून व छायाचित्रांतून निदर्शनास आले होते. काही वस्तू बेपत्ता आढळल्यास तशी नोटीसही अखिलेश यांना पाठवण्यात येणार असल्याचे कळते.