व्हॉटसअॅप आणि पोस्टकार्डवरुन तलाक देणा-या पतीला अटक
By admin | Published: April 4, 2017 01:06 PM2017-04-04T13:06:34+5:302017-04-04T13:06:34+5:30
16 मार्चला त्याने पत्नीला पोस्टकार्ड पाठवले. त्यावर तीनवेळा तलाक लिहीलेले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - लग्नानंतर आठवडयाभराच्या आत पोस्टकार्ड पाठवून तलाक घेणा-या पतीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद हनीफ (38) असे आरोपीचे नाव आहे. त्याने तालाबकट्टा येथे राहणा-या 26 वर्षीय मुस्लिम युवतीशी लग्न केले होते. लग्नाच्या दुस-याच दिवशी उपचारासाठी खासगी रुग्णालयात जायचे असल्याचे सांगून हनीफ घराबाहेर पडला.
16 मार्चला त्याने पत्नीला पोस्टकार्ड पाठवले. त्यावर तीनवेळा तलाक लिहीलेले होते. दोन साक्षीदाराच्या उपस्थितीत हा तलाक झाल्याचे हनीफने पोस्टकार्डवर लिहील होतं. याआधी व्हॉटसअॅपवरुन तलाक दिला होता आता पोस्टकार्ड पाठवून तलाक देतोय असे हनीफने पत्रामध्ये म्हटले आहे.
पत्र मिळाल्यानंतर पीडित पत्नी आपल्या आई-वडिलांच्या घरी आली व तिने रीतसर पोलिसात तक्रार दाखल केली. पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी हनीफला अटक केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये सुद्धा असेच एक प्रकरण समोर आले आहे. मुलगी झाल्याने पतीने फोनवरुन तीन वेळा तलाक शब्द उच्चारत तलाक दिल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच या पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांना न्याय देण्याचं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे. ही पीडित तरुणी लखीमपूर खीरीची रहिवासी आहे. योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
Hyderabad: Husband arrested for sending triple talaq message through postcard after wife lodged complaint. pic.twitter.com/ylEIVysfR5
— ANI (@ANI_news) April 4, 2017