गुप्तचर व दहशतवादी विरोधी पथकाकडून जिल्ात चाचपणी
By Admin | Published: February 22, 2016 12:02 AM2016-02-22T00:02:58+5:302016-02-22T00:14:14+5:30
जळगाव: पुणे येथील कसारखाना पोलीस स्टेशनच्या आवारात बॉम्बस्फोट घडविणार्या दहशतवाद्यांपैकी शेख मेहबूब उर्फ गुड्डू शेख उर्फ इस्माईल शेख (वय ३०) याचे जळगावशी कनेक्शन उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुप्तचर यंत्रणा व दहशतवादी विरोधी पथकाकडून जळगाव, भुसावळ व मुक्ताईनगर येथे जावून चाचपणी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

नाशिक व पुणे येथील काही अधिकार्यांनी जळगावात भेटी दिल्याची माहिती समोर येत आहेत. स्थानिक युनीटच्या मोजक्याच लोकांना या मोहीमेत सहभागी करुन घेण्यात आले होते. येथून माहिती संकलित करुन ती वरिष्ठांकडे सादर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. शेख मेहबूब याचे भुसावळ व मुक्ताईनगर येथे आजही मामा व जवळचे नातेवाईक वास्तव्याला आहेत.
शेख मेहबूब उर्फ गुड्डू शेख उर्फ इस्माईल शेख (वय ३०),अमजद रमजान खान (वय ३५), झाकीर हुसैन बद्रुल हुसैन उर्फ सादीक (वय ३३ तिन्ही रा.गणेश तलाई, खंडवा, मध्य प्रदेश) व मोहम्मद सलिक उर्फ सल्लू अब्दुल हकीम (वय ३२ रा.गुलशन नगर खंडवा) आदींना गेल्या आठवड्यात गुप्तचर यंत्रणा व पोलिसांनी ओडीशातून अटक केली होती.
जळगाव न्यायालयात सुरु आहे सिमीचा खटला
जळगाव जिल्हा हा सिमीचा अड्डा असल्याने अधूनमधून गुप्तचर यंत्रणा व दहशतवादी विरोधी पथकाकडून संवेदनशील भाग व त्यांच्या हालचाली असलेल्या भागात जावून चाचपणी केली जाते. जळगाव न्यायालयात सुरु असलेला सिमीचा खटला हा अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे यंत्रणांनी जळगाववरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
जळगाव-औरंगाबाद कनेक्शन
येथील सिमीचे कार्यकर्त्यांचे शेजारी असलेल्या औरंगाबादशी कनेक्शन असल्याचा संशय यंत्रणांना आहे, त्यामुळे एकाच वेळी या दोन्ही शहरातील हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. जळगावात आजही सिमीच्या गुप्त बैठका घेतल्या जातात. नागपुर बॉम्बस्फोटातील संशयित शेख मुश्ताक शेख शफी हा मुळचा जळगावचा आहे, माथ सध्या तो फरार आहे.