नकली पॅन कार्ड ओळखणारे तंत्र शोधले
By admin | Published: March 21, 2016 02:40 AM2016-03-21T02:40:27+5:302016-03-21T02:40:27+5:30
आयकर विभागाने नकली पॅन कार्ड ओळखणारे नवे तंत्रज्ञान शोधले आहे. या माध्यमातून नकली पॅनच्या समस्येवर तोडगा निघू शकतो, असा दावा केला आहे.
Next
नवी दिल्ली : आयकर विभागाने नकली पॅन कार्ड ओळखणारे नवे तंत्रज्ञान शोधले आहे. या माध्यमातून नकली पॅनच्या समस्येवर तोडगा निघू शकतो, असा दावा केला आहे.
या विभागाने महत्त्वाकांक्षी इलेक्ट्रॉनिक स्मार्ट प्लॅटफॉर्म इन्कम टॅक्स बिझनेस अॅप्लिकेशन - परमनंट अकाऊंट नंबर हे विकसित केले आहे. यामुळे कर अधिकाऱ्यांना, तसेच पॅन जारी करणाऱ्या मध्यस्थांना नकली पॅन ओळखण्यात मदत मिळणार आहे. जेव्हा यासंदर्भातील अर्ज आयकर विभागाकडून या पोर्टलवर दाखल होईल तेव्हा नकली पॅनची ओळख करण्यास मदत मिळणार आहे.