आघाडीच्या काळातच अधोगती
By admin | Published: October 7, 2014 05:24 AM2014-10-07T05:24:27+5:302014-10-07T05:24:27+5:30
गेल्या १५ वर्षांच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारी बँक व सहकारी साखर कारखाने संपविले. सत्तेच्या काळात गुंडगिरी व घोटाळ्यांशिवाय काय केले
Next
पुणे : गेल्या १५ वर्षांच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारी बँक व सहकारी साखर कारखाने संपविले. सत्तेच्या काळात गुंडगिरी व घोटाळ्यांशिवाय काय केले, असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केला.
शहा म्हणाले, महाराष्ट्रातील सहकार, जलसिंचन योजना, सर्वाधिक गुंतवणूक व उद्योगामुळे एकेकाळी या राज्याने देशाचे नेतृत्व केले आहे. परंतु, गेल्या १५ वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीने घोटाळ््याशिवाय काहीच केले नाही. ११ लाख २८ हजार कोटींचे घोटाळे करून मंत्र्यांची घरे भरली, असा आरोप केला.