दहशतवाद्यांना 'ऑल आऊट' करण्याचा लष्कराचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 11:06 AM2017-08-02T11:06:49+5:302017-08-02T11:12:00+5:30

सुरक्षा तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व सरकारच्या नव्या रणनीतीचा परिणाम आहे. ज्यामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी झीरो टॉलरंस धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. 

The determination of the army to "all-out" the terrorists | दहशतवाद्यांना 'ऑल आऊट' करण्याचा लष्कराचा निर्धार

दहशतवाद्यांना 'ऑल आऊट' करण्याचा लष्कराचा निर्धार

Next
ठळक मुद्देसुरक्षा जवानांना गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात चांगलं यश मिळत आहेदहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी झीरो टॉलरंस धोरणाची अंमलबजावणी केली जात आहेलष्कराच्या कारवाईमुळे जानेवारी ते जुलैदरम्यान १०२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे

नवी दिल्ली, दि. 2 -  अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याची आखणी करणारा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबु दुजाना आणि त्याच्या साथीदाराचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला. बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर सुरक्षा जवानांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. सुरक्षा जवानांना गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात चांगलं यश मिळत आहे. सुरक्षा तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व सरकारच्या नव्या रणनीतीचा परिणाम आहे. ज्यामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी झीरो टॉलरंस धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. 

गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार काश्मीरसंबंधी मुख्य तीन गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे, ज्यामध्ये जर का दहशतवादी आत्मसमर्पण करण्यास नकार देत असेल तर त्यांना ठार करण्यात येत आहे. चकमक होत असलेल्या ठिकाणी स्थानिकांकडून निदर्शन होत असलं तरी त्याचा काहीच प्रभाव सुरक्षा जवानांवर होत नाही. सोबतच टेरर फंडिंगशी संबंधित हुर्रियत फुटीरवादी नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय, स्थानिक लोकांसोबत शक्य तितकी नरमाईची भूमिका घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल ज्यामुळे त्यांना आपण पीडित असल्याचं भासू नये. येणा-या दिवसांमध्ये सुरक्षा जवान आपली ही भूमिका कायम ठेवतील असं एका अधिका-याने सांगितलं आहे. 

सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे दहशतवाद्यांवरील दबाव अजून वाढेल. याशिवाय अन्य मोठे दहशतवादी ज्यामध्ये अबू इस्माईल आणि हिजबूल, अलकायदाशी संबंधित झाकीर मूसा यांचा समावेश आहे, त्यांना ठार करण्यासाठी लष्कराकडे प्लान तयार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्थानिक सुत्रांकडून मिळणारी माहिती आणि सुरक्षा जवानांमध्ये होणारा योग्य सुसंवाद यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाभूत करण्यात यश मिळेल असा विश्वास सरकारला आहे. 

जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या सात महिन्यांत लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून एकूण १०२ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर अनेक दहशतवादी लष्कराच्या हिट लिस्टवर आहेत. गेल्या सात वर्षात जानेवारी ते जुलैदरम्यान चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. 

लष्कराच्या कारवाईमुळे जानेवारी ते जुलैदरम्यान १०२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे. याआधी २०१० साली लष्कराने सुमारे १५६ दहशतवाद्यांना ठार केले होते. तर २०१६ मध्ये याच काळात ७७, २०१५ आणि २०१४ मध्ये प्रत्येकी ५१, २०१३ मध्ये ४३, २०१२ मध्ये ३७ आणि २०११ मध्ये ६१ दहशतवाद्यांना चकमकीत कंठस्नान घालण्यात आले होते.  दहशवाद्यांसोबतच्या सर्वाधिक चकमकी या दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियाँन आणि अनंतनाग जिल्ह्यात झाल्या आहेत. तर उर्वरित चकमकी या उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यात  आणि मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झाल्या आहेत. 

Web Title: The determination of the army to "all-out" the terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.