राज्यभरात दुचाकीने करणार सौरउर्जेच्या वापराबाबत प्रचार पुण्याचा सौरभ लक्ष्मण कुंभार यांचा निर्धार

By admin | Published: December 8, 2015 12:03 AM2015-12-08T00:03:09+5:302015-12-08T00:03:09+5:30

जळगाव- पुणे येथील सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे रा.पुणे हे जळगावात दाखल झाले. प्रथम त्यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना भेटून सौरऊर्जेविषयी माहिती देऊन निवेदन दिले. तसेच जिल्हा परिषद जळगाव उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांना भेटून सौर ऊर्जेविषयी माहिती देऊन निवेदन दिले. त्यानंतर सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे यांचा जळगाव जिल्हा पत्रकार भवनात कार्यक्रम झाला. या महाराष्ट्र भ्रमण सौर ऊर्जा जनजागृती विषयी सत्कार केला. सौरभ कुंभार हे मागील वर्षापासून सौर ऊर्जा वापरासंबंधी प्रबोधनाचे कार्य करीत आहे. या कार्यक्रमात ते मंत्रालय ते ग्रामपंचात स्तरावर भेट देऊन समक्ष या सौर ऊर्जेबाबत माहिती देऊन व शासनाकडून या विषयी कुठली मदत मिळते ते सुध्दा ते सांगतात हे सर्व प्रबोधन करुन जनतेत सौर ऊर्जेविषयी जनजागृती

The determination of Saurabh Laxman Kumbhar for the promotion of the use of solar powered bicycles across the state | राज्यभरात दुचाकीने करणार सौरउर्जेच्या वापराबाबत प्रचार पुण्याचा सौरभ लक्ष्मण कुंभार यांचा निर्धार

राज्यभरात दुचाकीने करणार सौरउर्जेच्या वापराबाबत प्रचार पुण्याचा सौरभ लक्ष्मण कुंभार यांचा निर्धार

Next
गाव- पुणे येथील सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे रा.पुणे हे जळगावात दाखल झाले. प्रथम त्यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना भेटून सौरऊर्जेविषयी माहिती देऊन निवेदन दिले. तसेच जिल्हा परिषद जळगाव उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांना भेटून सौर ऊर्जेविषयी माहिती देऊन निवेदन दिले. त्यानंतर सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे यांचा जळगाव जिल्हा पत्रकार भवनात कार्यक्रम झाला. या महाराष्ट्र भ्रमण सौर ऊर्जा जनजागृती विषयी सत्कार केला. सौरभ कुंभार हे मागील वर्षापासून सौर ऊर्जा वापरासंबंधी प्रबोधनाचे कार्य करीत आहे. या कार्यक्रमात ते मंत्रालय ते ग्रामपंचात स्तरावर भेट देऊन समक्ष या सौर ऊर्जेबाबत माहिती देऊन व शासनाकडून या विषयी कुठली मदत मिळते ते सुध्दा ते सांगतात हे सर्व प्रबोधन करुन जनतेत सौर ऊर्जेविषयी जनजागृती करीत आहेत.
अरुण कोष्टी व मुकेश कुरील, नीलेश पाटील यांनी पत्रकार भवन येथे कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खुशाल सोनवणे, अक्षय अवस्थी, राहुल साळुंके, विनय निंबाळकर यांनी परिश्रम घेतले.
वीज प्रत्येकाची गरज असल्याने विजेची बचत हीच एक प्रकारे विजेची निर्मिती आहे. भारनियमन व अपुरा वीज पुरवठा यामुळे सामान्य नागरिक हैराण होणारे हाल लक्षात घेऊन सौर ऊर्जेच्या माध्यमातून भारनियमन काळात विजेचा वापर करता यावा यासाठी पुणे येथील सौरभ लक्ष्मण कुंभार व संतोष खोमणे हे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालयास दुचाकीवरुन भेट देऊन शासकीय कार्यालयात व त्यांच्या संलग्न संस्थेत सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत १ डिसेंबर या कालावधित दुचाकीने प्रचार व प्रसार करणार आहे.
या प्रवासात साधारणत: ५ हजार ५०० किलोमीटर प्रवास ३४ जिल्हा मुख्यालयास भेटी ५ हजार लोकांशी प्रत्यक्ष भेटी, ५० हजार लोकांशी अप्रत्यक्ष भेटी आणि जिल्हास्तरावर असलेले सहकार्‍यांची भेट घेऊन प्रत्येक जिल्हा स्तरावर सौर ऊर्जेचा वापर करणेबाबत जनजागृती करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून प्रवासाचे नियोजन केलेले आहे.

Web Title: The determination of Saurabh Laxman Kumbhar for the promotion of the use of solar powered bicycles across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.