लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 10:15 PM2020-07-29T22:15:36+5:302020-07-29T22:19:40+5:30

हा साबण विक्रीच्या बाबतीत पहिल्यांदाच क्रमांक एकवर पोहोचला आहे. यानं हिंदुस्तान युनीलिव्हरचे दोन प्रसिद्ध साबण लाईफबॉय (Lifebuoy) आणि लक्सलाही (Lux) मागे टाकले आहे. 

dettol made a record in corona period become india's largest selling soap brands | लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुळे भारतीय साबण बाजारातही मोठा बलद झाला आहे.कोरोनामुळे डेटॉल (Dettol) साबानाकडे  लोकांचा ओढा वाढला असून या साबणाची विक्रीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डेटॉल साबण विक्रीच्या बाबतीत पहिल्यांदाच क्रमांक एकवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली - कोरोना काळात हात धुन्यासाठी साबणाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे भारतीय साबण बाजारातही मोठा बलद झाला आहे. या काळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना सातत्याने हात धुन्याचे आवाहन केले जात आहे. यामुळे डेटॉल (Dettol) साबानाकडे  लोकांचा ओढा वाढला असून या साबणाची विक्रीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे आता डेटॉल हा भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा साबण बनला आहे. 

डेटॉल साबण विक्रीच्या बाबतीत पहिल्यांदाच क्रमांक एकवर पोहोचला आहे. डेटॉलने हिंदुस्तान युनीलिव्हरचे दोन प्रसिद्ध साबण लाईफबॉय (Lifebuoy) आणि लक्सलाही (Lux) मागे टाकले आहे. 

जागतीक विक्रीत वाढ -
साबणांच्या परफॉर्मन्सचा विचार करता, याच्या जागतीक विक्रीत 62 टक्के वाढ झाली आहे. डेटॉलच्या भारतीय बाजारातील शेअरमध्ये 430 बेसिस पॉइंटची वाढ झाली आहे. 2019 मध्ये भारतीय साबण बाजारात लाईफबॉयचा शेअर 13.1 टक्के एवढा होता. तर डेटॉलचा शेअर 10.4 टक्के होता. दुसऱ्या स्थानावर गोदरेज (Godrej) ब्रँड आहे. याचा बाजारातील शेअर 12.3 टक्के होता. गेल्या दोन वर्षांत डेटॉलच्या मार्केट शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2017 मध्ये भारतीय बाजारात डेटॉलचा शेअर 9.7 टक्के होता. तो 2019 मध्ये वाढून 10.4 टक्क्यांवर पोहोचला. डेटॉलच्या मार्केट शेअरमध्ये 430 bps ची वाढ झाली आहे. 1 bps म्हणजे एका बेसिस पॉइंटचा शंभरावा भाग असतो.

दुसऱ्या क्रमांकावर गोदरेज - 
याच बोरोबर दुसरा क्रमांक लागतो Godrej ब्रँडचा, याचा बाजारातील शेअर 2019 मध्ये 12.3 टक्के होता. भारतीय साबण बाजार जवळपास 22000 कोटी रुपयांचा आहे. 2020 च्या पहिल्या सहामाहीत डेटॉलच्या विक्रीत 500 कोटी रुपयांची तेजी आली होती.

Lifebuoy चा बाजारातील शेअर घटला - 
गेल्या 2017 मध्ये लाईफबॉयचा बाजारातील शेअर 15.7 टक्के होता. तो दोन वर्षांत कमी होऊन 2019 मध्ये 13.1 टक्क्यांवर आला. दुसरीकडे डेटॉलचा बाजारातील शेअर वाढला आहे. डेटॉल साबण हा यूके हेल्थकेअर अँड कंझुमर गुड्स मेकर Reckitt Benckiser चा ब्रँड आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

Unlock 3 Guidelines : जिमचं दार उघडणार, नाईट कर्फ्यूही मागे; पण शाळा-कॉलेज, थिएटर्स बंदच

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करून शकतं राफेल

सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

 

Web Title: dettol made a record in corona period become india's largest selling soap brands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.