Dev Joshi SpaceX Moon Trip: 'बालवीर'ची चंद्रवारी; DearMoon प्रोजेक्टमध्ये झाली निवड, अशी मिळाली संधी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 03:39 PM2022-12-11T15:39:28+5:302022-12-11T15:41:43+5:30
Dev Joshi SpaceX Moon Trip: मुलांचा आवडता सूपरहिरो 'बालवीर' म्हणजेच देव जोशी चंद्रावर जाणार आहे. जापानच्या उद्योगपतीने त्याला ही संधी दिली आहे.
Dev Joshi SpaceX Moon Trip: लहानपणापासून चंदा मामा म्हणजेच चंद्राबद्दल अनेक कथा मुलांना सांगितल्या जातात. चंदा मामा प्रत्येकाच्या मनाच्या जवळ आहे. पण खऱ्या आयुष्यात जर एखाद्याला चंद्रावर जाण्याची संधी मिळाली तर बातच न्यारी... तुम्हाला वाचून धक्का बसेल, पण टीव्हीचा प्रसिद्ध शो 'बालवीर'चा अभिनेता देव जोशी याला चक्क चंद्रावर जाण्याची संधी मिळाली आहे.
देव चंद्रावर फिरायला जाणार...
ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण पण हे सत्य आहे. मुलांचा सर्वात आवडता आणि टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो बलवीरमध्ये बालवीरची भूमिका साकारणारा अभिनेता देव जोशी चंद्रावर जाणार आहे. खुद्द देव जोशी यानेच त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे.
अशी मिळाली संधी?
जापानी उद्योगपती युसाकू माएझावा यांनी चंद्रावर जाण्यासाठी ट्रिप प्लॅन केली आहे. चंद्राच्या सहलीला जाण्यासाठी युसाकू माएझावाने इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. चंद्रावर जाण्यासाठी लाखो लोकांनी अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यापैकी केवळ 10 जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे बालवीर फेम अभिनेता देव जोशी. चंद्रावर फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये देव जोशी याचेही नाव आहे. देव 'डिअर मून' प्रोजेक्टचा क्रू मेंबर असेल.हे सर्व निवडक लोक 2023 मध्ये मून वॉकसाठी रवाना होतील. ही सहल आठवडाभराची असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय चाचणीनंतर या सहलीसाठी सर्व लोकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
Proud to share this news with Everyone! 🌍
— Dev Joshi (@devjoshi10) December 8, 2022
We all are artistes, and we are going to Moon...🌜#dearMoonCrew#dearMoonprojecthttps://t.co/yfeFZWnU0M
काय म्हणाला देव जोशी
चंद्रावर जाण्याची संधी मिळाल्यामुळे देव जोशी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली. त्याने ट्विटर हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, 'मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. ही भावना सर्व गोष्टींच्या पलीकडे आहे. असाधारण, अविश्वसनीय, #DearMoon प्रकल्पाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. आयुष्याने मला नेहमीच नवीन संधी देऊन आश्चर्यचकित केले आहे आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी गोष्ट आहे.'