देवदासी बनली सीईओ
By admin | Published: May 6, 2016 02:29 PM2016-05-06T14:29:11+5:302016-05-06T14:29:11+5:30
देवदासीच्या अनिष्ट प्रथेमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. या प्रथेमध्ये ओढले गेल्यानंतर त्यातून बाहेर पडणे मुश्किल असते.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ६ - देवदासीच्या अनिष्ट प्रथेमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. या प्रथेमध्ये ओढले गेल्यानंतर त्यातून बाहेर पडणे मुश्किल असते. पण सिताव्वा जोदात्ती ही महिला मात्र याला अपवाद ठरली आहे. वयाच्या सातव्या वर्षी देवदासीचे जगणे नशिबी आलेल्या सितव्वाने प्रथा, परंपराशी लढा दिला आणि आज ती एका संस्थेची सीईओ आहे.
सितव्वाचा ज्या कुटुंबामध्ये जन्म झाला तिथे तिच्यासह एकूण नऊ मुली होत्या. आई-वडिलांना मुलगा नव्हता. मोठया कुटुंबाचा चरितार्थ चालवणे कठिण असल्याचे घरात गरीबी होती. सितव्वाचे वडील आजारी पडले. त्यांना कामावर जाणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांचा उत्पन्नाचा एकमेव स्त्रोतही गेला त्यानंतर सितव्वाच्या आईने तिला देवदासी बनवले.
सितव्वा ज्या माणसाबरोबर रहात होती. तो तिच्या कुटुंबाला नियमित पैसे आणि रेशन पुरवत होता. कर्नाटक सरकारने १९८७ साली कायदा करुन देवदासी प्रथेवर बंदी आणली. त्यामुळे सितव्वाची सुटका झाली. १९९० च्या सुरुवातीला देवदासी म्हणून राहिलेल्या महिलांनी स्वंयम मदत गटांची स्थापना केली आणि सितव्वा त्या बैठकींना उपस्थित रहाण्यास सुरुवात केली.
त्यानंतर तिने महिला-मुलांच्या हक्क, बाल मानसशास्त्र, लैंगिक आजार, आर्थिक व्यवस्थापन या विषयावर काम करणा-या 'मास' संस्थेसाठी काम सुरु केले आता ती मासची सीईओ आहे.