विकसित देशही वापरतात मतपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:03 AM2018-03-31T05:03:19+5:302018-03-31T05:03:19+5:30
तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत प्रगत असलेल्या अनेक विकसित देशांमध्ये आजमितीला निवडणुकांत मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत प्रगत असलेल्या अनेक विकसित देशांमध्ये आजमितीला निवडणुकांत मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकाच वापरल्या जातात, अशी कबुली केंद्र सरकारने दिली आहे.
अनेक विकसित व लोकशाही राजवट असलेले देश ईव्हीएमचा वापर का करीत नाहीत, याची कारणे काय आहेत? त्यामागील कारणांचा कोणी अभ्यास केला आहे का? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला होता. त्यावर केंद्रीय विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की, विकसित देशांमध्ये ईव्हीएम मशीन का वापरली जात नाही यामागच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला नसल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. ईव्हीएममुळे मतदानात पारदर्शकता आली. व्हीव्हीपीएटी मशिन्समुळे त्याला आणखी बळ मिळाले आहे.
अमेरिका, आॅस्ट्रेलिया, अर्जेंटिना, नामिबिया, भूतान, ब्राझिल, व्हेनेझुएला, अर्मेनिया, बांगलादेश, जपान, आॅस्ट्रेलिया, बेल्जियम, बल्गेरिया, इटली, कॅनडा, मेक्सिको, चिली, पेरू आदी देशांमध्ये ईव्हीएम वापरले जाते, असे आयोगाने सरकारला कळविले.