पर्यावरण संतुलनासाठी कुंभारखोरे क्षेत्र विकसित करणार

By admin | Published: July 4, 2016 12:45 AM2016-07-04T00:45:59+5:302016-07-04T00:45:59+5:30

जळगाव : बँक पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानवता वादावर आधारीत सामाजिक भावनेतून काम करीत आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर बँकेची प्रगती सुरु असून सामाजिक दायित्व म्हणून जळगाव जनता बँक, सामाजिक वनीकरण विभाग व केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमतातून कुंभारखोरे विकसित करण्याचा मनोदय जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी आज बँकेच्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केला. तसेच तरुणांना स्वयंरोजगार करता यावा म्हणून बँक स्टार्ट अप व इतर विविध योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Developing pottery areas for environmental balance | पर्यावरण संतुलनासाठी कुंभारखोरे क्षेत्र विकसित करणार

पर्यावरण संतुलनासाठी कुंभारखोरे क्षेत्र विकसित करणार

Next
गाव : बँक पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानवता वादावर आधारीत सामाजिक भावनेतून काम करीत आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर बँकेची प्रगती सुरु असून सामाजिक दायित्व म्हणून जळगाव जनता बँक, सामाजिक वनीकरण विभाग व केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमतातून कुंभारखोरे विकसित करण्याचा मनोदय जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी आज बँकेच्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केला. तसेच तरुणांना स्वयंरोजगार करता यावा म्हणून बँक स्टार्ट अप व इतर विविध योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
संत बाबा हरदासराम समाज मंदिरात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सभेस १९९५ सभासद उपस्थित होते.
स्वाती देशमुख यांच्या वंदेमातरम् व सहकार मंत्राने सभेची सुरुवात झाली. त्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले व आपल्या मनोगतात बँकेची गेल्या ४० वर्षातील प्रगती व त्यातील विविध टप्पे मांडले. त्यानंतर या वर्षात मयत झालेल्या महनीय व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली यामध्ये भवरलाल जैन, बँकेचे संस्थापक संचालक वसंतराव शर्मा, बँकेचे पहिले व्यवस्थापक मधुकर खाडीलकर व इतर मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आपल्या मनोगतात अनिल राव यांनी पुढे सांगितले की, समाजातील शेवटच्या घटकाला सक्षम करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेच्या प्रगतीत बँकेचे स्थापनेपासूनचे सर्व संचालक, सभासद व कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे.

विविध योजनांची घोषणा....
-नाशिक येथील श्री गुरुजी रुग्णालय व औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात सभासदांनी उपचार घेतल्यास येणार्‍या खर्चाच्या १० टक्के रक्कम बँकेच्या सभासद कल्याण निधीतून देण्यात येईल.
-वर्षभरात महिला बचत गट सक्षमीकरणावर भर (यामध्ये बचत गटांसाठी व्याजदर कमी करणे, पाच कोटींचे अनुदान देण्याचा प्रयत्न).
- पंतप्रधान मुद्रा योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा, यामध्ये तीन दिवसात कर्ज देण्यात येईल.
-विद्यापीठ, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी विविध योजना
-बँकेच्या वेबसाईटवर तक्रार टाकल्यानंतर १५ दिवसात ती निवारणाच्या पुढील सभेचा अजेंडा राहील.
- बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या वास्तू उभारणीच्या कामास या वर्षी सुरुवात करण्यात येणार.

Web Title: Developing pottery areas for environmental balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.