देवव्रत मुखर्जी एबीसीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय परिषदेवर देवेंद्र दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:47 AM2017-09-15T03:47:56+5:302017-09-15T03:48:12+5:30

आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनच्या अध्यक्षपदी कोका कोलाच्या नेर्ऋत्य आशिया विभागाचे उपाध्यक्ष (आॅपरेशन्स) देवव्रत मुखर्जी तर उपाध्यक्षपदी मुंबई समाचारचे होरमसजी कामा यांची निवड झाली आहे.

 Devendra Darda, chairman of the ABC on Managing Director of Debabrata Mukherjee | देवव्रत मुखर्जी एबीसीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय परिषदेवर देवेंद्र दर्डा

देवव्रत मुखर्जी एबीसीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय परिषदेवर देवेंद्र दर्डा

Next

 नवी दिल्ली : आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनच्या अध्यक्षपदी कोका कोलाच्या नेर्ऋत्य आशिया विभागाचे उपाध्यक्ष (आॅपरेशन्स) देवव्रत मुखर्जी तर उपाध्यक्षपदी मुंबई समाचारचे होरमसजी कामा यांची निवड झाली आहे. या नेमणुका एका वर्षासाठी आहेत. होरमुज्द मसानी हे सेक्रेटरी जनरल असतील.
एबीसीच्या व्यवस्थापकीय परिषदेवर सदस्य म्हणून प्रकाशक गटातून निवड झालेल्या सदस्यांत लोकमत मीडियाचे देवेंद्र दर्डा यांच्याबरोबरच आय. वेंकट, शैलेश गुप्ता, बिनॉय रॉयचौधरी, चंदन मजुमदार, राजकुमार जैन, प्रताप पवार यांचा समावेश आहे. जाहिरात कंपन्यांच्या गटातून मधुकर कामत, शशीधर सिन्हा, श्रीनिवास स्वामी, सीव्हीएल श्रीनिवास यांची निवड झाली आहे. हेमंत मलिक, संदीप टर्कस व मयंक परिक हे जाहिरात प्रतिनिधी गटातून निवडून गेले आहेत.

Web Title:  Devendra Darda, chairman of the ABC on Managing Director of Debabrata Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत