देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, राजीनाम्याच्या मुद्द्यावर करणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 07:18 AM2024-06-07T07:18:53+5:302024-06-07T07:19:22+5:30
फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असले तरी भाजपश्रेष्ठी त्यांच्याविषयी कोणता निर्णय घेणार हे अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये स्पष्ट होणार आहे.
नवी दिल्ली : राज्यातील महायुती सरकारमधून मुक्त होऊन पक्षामध्ये पू्र्णवेळ काम करण्याची संधी द्यावी अशी भाजपश्रेष्ठींना विनंती करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी नागपूरमधून दिल्लीत दाखल झाले.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील सत्ताधारी महायुतीच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा त्याग करण्याची इच्छा केली आहे. या मुद्यावर दिल्लीत प्रत्यक्ष भेटून चर्चा करू, असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्यामुळे ते दिल्लीत पोहोचले.
फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असले तरी भाजपश्रेष्ठी त्यांच्याविषयी कोणता निर्णय घेणार हे अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये स्पष्ट होणार आहे. त्यांनी पक्षकार्याला वाहून घेण्याची तयारी दर्शविली असली तरी प्रदेश भाजपच्या अध्यक्षांना बदलणार नसल्याचे संकेत देण्यात येत आहे. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याशी त्यांची भेट झालेली नव्हती.