फडणवीसांनी हसून उडवली खिल्ली, मलिकांच्या 'हायड्रोजन बॉम्ब'वर मोजकीच टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:57 PM2021-11-10T15:57:33+5:302021-11-10T15:59:04+5:30

भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांच्या हायड्रोजन बॉम्बसंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता.

Devendra Fadnavis laughs and mocks, few comments on Nawab Malik's hydrogen bomb | फडणवीसांनी हसून उडवली खिल्ली, मलिकांच्या 'हायड्रोजन बॉम्ब'वर मोजकीच टिपण्णी

फडणवीसांनी हसून उडवली खिल्ली, मलिकांच्या 'हायड्रोजन बॉम्ब'वर मोजकीच टिपण्णी

Next
ठळक मुद्देनवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी हे ट्विट केलंय. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटचा टोला स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून येते. 

नागपूर - भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला. त्यानुसार, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. मलिक यांच्या आरोपाला फडणवीस यांनी ट्विट करुन एका वाक्यात उत्तर दिलं. मात्र, पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यावरही थोडकीच प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.  

भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांच्या हायड्रोजन बॉम्बसंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, मला वाटतं मी केलेलं ट्विट पुरेसं बोलकं आहे, आशिष शेलार यांची प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा जास्त त्याला काही वजनही नाहीये, मग त्याला कशाला जास्त वजन देताय, असेही फडणवीस यांनी म्हटले. तसेच, फडणवीसांनी मलिक यांची हसत हसत खिल्लीही उडवली. दरम्यान, सकाळीच फडणवी यांनी ट्विट करुनही टोला लगावला होता. 'खूप पूर्वीच एक गोष्ट शिकलोय, डुकराशी कधीही कुस्ती करू नका. कारण, तुम्ही गलिच्छ व्हाल आणि डुकराला तेच आवडेल,' अशा आशयाचे ट्विटही फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, पण नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी हे ट्विट केलंय. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटचा टोला स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून येते. 

त्यानंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा - फडणवीस

विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना, राज्य भाजप समितीची लवकरच बैठक घेऊन उमेदवारांची नावे निश्चित करू. त्यानंतर, केंद्रातील भाजपच्या समितीकडे ती यादी पाठवू, अध्यक्षांकडे पाठवून त्यानंतर उमेदवारांची घोषणा होईल, त्याला अजून वेळ आहे, असे फडणवीस यांनी विधानपरिषदेच्या भावी उमेदवारांबद्दल बोलताना म्हटले. 

मलिकांनी फडणवीसांवर काय केले आरोप

फडणवीसांबाबत हायड्रोजन बॉम्ब फोडणार म्हणत, नवाब मलिक म्हणाले की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली होती. नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल. काळा पैसा, बनावट नोटा संपुष्टात येतील असा दावा करण्यात येत होता. नोटाबंदी झाल्यानंतर देशातील विविध भागात बनावट नोटा सापडल्या. मात्र, महाराष्ट्रात ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत बनावट नोटांचे एकही प्रकरण समोर आली नव्हेत. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबईतील बीकेसीमध्ये छापेमारी झाली. त्यात १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. मात्र हे प्रकरण दाबून टाकण्यास देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. बनावट नोटांचा धंदा देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली चालत होता, असा दावा मलिक यांनी केला.

दरम्यान, बनावट नोटाप्रकरणाता मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली. तर पुण्यातही एकाला अटक करण्यात आली. इम्रान आलम शेख असे यामध्ये अटक झालेल्या एका व्यक्तीचे नाव होते. याप्रकरणी नवी मुंबईतही अटकेची कारवाई झाली. पण १४ कोटी ५६ लाख किमतीच्या बनावट नोटांचे हे प्रकरण ८ लाख ८० हजार रुपयांच्या बानावट असल्याचे दाखवून दाबले, असा आरोप मलिक यांनी केला. हे बनावट नोटांचे प्रकरण एनआयएकडे का सोपवले गेले नाही, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.

Web Title: Devendra Fadnavis laughs and mocks, few comments on Nawab Malik's hydrogen bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.