"होय, मी भक्त आहे अन् त्याचा मला अभिमान आहे"; अमृता फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:03 PM2021-06-28T21:03:06+5:302021-06-28T21:07:05+5:30
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत दिली प्रतिक्रिया. पाहा काय म्हटलंय अमृता फडणवीस यांनी.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा उत्तम पर्याय असल्याचं जाणकारांनी म्हटलं होतं. दरम्यान, केंद्र सरकारनं व्यापक प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण केंद्र सरकारद्वारे करण्यात येत होतं. परंतु २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दरम्यान, आता भारतानं विक्रमी लसीकरण केलं आहे. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.
भारतानं नुकतंच ३२३,६६ दशलक्ष लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. हे लसीकरण अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. यासंदर्भातील एक फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "होय मी भक्त आहे, अन् मला अभिमान आहे," असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
हाँ ! मैं भक्त हूँ !
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) June 28, 2021
और मुझे गर्व है ! pic.twitter.com/I9oA0C0ZQy
भारतानं २८ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२३.६६ दशलक्ष नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. ही संख्या अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. अमेरिकेत ३२३.३३ दशलक्ष नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. युनायटेड किंगडममध्ये या तारखेपर्यंत ७६.३२ दशलक्ष, तर जर्मनीतर ७१.४४, फ्रान्समध्ये ५२.४६ आणि इटलीमध्ये ४९.६५ दशलक्ष नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.