राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाचे दर्शन घ्यायचेय?, असे करा नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 08:34 AM2024-01-22T08:34:06+5:302024-01-22T09:16:54+5:30

सध्या स्थानिक प्रशासनाने दररोज ३०-४० हजार लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

Devotees from all over the world including India will gather for Ram darshan after the Pranapratistha ceremony of Ram temple. | राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाचे दर्शन घ्यायचेय?, असे करा नियोजन

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाचे दर्शन घ्यायचेय?, असे करा नियोजन

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामलला दर्शनासाठी भारतासह जगभरातून भाविकांची गर्दी होणार आहे. सध्या अयोध्येत दररोज येणाऱ्या भाविकांची सरासरी संख्या ३५ हजार असल्याचे सांगण्यात येत असून, २२ जानेवारीनंतर ही संख्या एक ते दीड लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाविकांच्या निवास, भोजन आदींची संपूर्ण व्यवस्था, तसेच शहर स्वच्छतेचे मोठे आव्हान सरकार आणि प्रशासनासमोर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दर तिसऱ्या दिवशी व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. सध्या स्थानिक प्रशासनाने दररोज ३०-४० हजार लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

आरती आणि दर्शनाची वेळ

जागरण/ श्रृंगार आरती : सकाळी ६:३० वाजता
भोग आरती : दुपारी १२ 
संध्याकाळची आरती रात्री ७:३० वाजता
दर्शन वेळ : सकाळी ७:०० ते ११:३० आणि दुपारी २:०० ते संध्याकाळी ७:००

असा काढा पास

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वेबसाईटला भेट द्या.
ओटीपी प्राप्त करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा.
आरती किंवा दर्शनासाठी स्लॉट बुक करण्यासाठी ‘माय प्रोफाइल’ वर जा. 
आरतीची तारीख आणि वेळ निवडा.
आवश्यक माहिती द्या.
प्रवेश करण्यापूर्वी, मंदिराच्या आवारातील काउंटरवरून आपला पास घ्या.

कसे घेता येणार दर्शन?

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वसामान्य भाविकांना ऑनलाइन पास बुक करून दर्शनासाठी जाता येणार आहे. पास बुकिंगच्या दिवशी स्लॉटच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. श्रीराम जन्मभूमी येथील कार्यालयात भाविकांना आरतीच्या वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहावे लागेल. पास मिळवण्यासाठी तुमच्याकडे वैध सरकारी ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

 

Web Title: Devotees from all over the world including India will gather for Ram darshan after the Pranapratistha ceremony of Ram temple.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.