Ram Mandir: राम मंदिरासाठी भक्तांनी खुली केली धनाची 'पेटी', बांधकामासाठी जमा झाले कोटीच्या कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:34 AM2023-01-04T11:34:43+5:302023-01-04T11:35:32+5:30
Ayodhya Ram Mandir Construction: भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत श्री रामाचे भव्य आणि दिव्य मंदिर बांधले जात आहे.
अयोध्या : भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत श्री रामाचे भव्य आणि दिव्य मंदिर बांधले जात आहे. मंदिराचे बांधकाम तसेच पूजा पाहण्यासाठी दूरदूरवरून भाविक दररोज अयोध्येत पोहोचत आहेत. मागील वर्षी 2022 मध्ये राम भक्तांनी त्यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी भरघोस दान केले. कारण 2022 या वर्षामध्ये रामभक्तांनी त्यांची कमाई मोठ्या प्रमाणात प्रभू श्रीरामाला समर्पित केली होती. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी श्रीरामाच्या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 20 कोटी रुपये दान करण्यात आले आहेत.
अयोध्येतील रामाचे बहुप्रतिक्षित भव्य मंदिर नियोजित वेळेच्या मर्यादेनुसार जलद गतीने बांधले जात आहे. मंदिर उभारणीच्या प्रगतीबाबत ट्रस्टचे अधिकारी वेळोवेळी मंदिर बांधकामाची स्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे मंदिराचे बांधकाम ऑक्टोबर 2023 मध्ये पूर्ण होईल आणि जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी गर्भगृहात रामाची प्रतिष्ठापना केली जाईल.
नवीन वर्षात भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, 2022 मध्ये जवळपास 20 कोटी रुपये देणगी राम मंदिराच्या बांधकामासाठी मिळाली आहे. रामभक्त दर महिन्याला एक कोटींहून अधिक रुपये श्रीरामाला अर्पण करतात. यासोबतच ऑनलाइन चेकद्वारेही देणगी दिली जात आहे. मागील वर्षभरात एकूण 20 कोटी रुपये मिळाले आहेत. भाविकांची संख्या आणखी वाढल्यास श्रीरामाच्या मंदिराच्या उभारणीसाठी भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देतील. प्रकाश गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षाच्या दिवशी कडाक्याच्या थंडीने धुके झाकले होते. असे असूनही भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी हजेरी लावली होती. सकाळी सहा वाजल्यापासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण अयोध्येत केवळ भाविकच दिसत होते. एक लाखाहून अधिक भाविकांनी प्रभू श्रीराम यांची पूजा करून नवीन वर्षाची सुरुवात केली
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"