भक्तिरसांनी सजलेला ‘गोपाला को समर्पण’, भक्तिपर रचलेल्या गाण्यांच्या कार्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:50 AM2017-09-03T01:50:19+5:302017-09-03T01:50:32+5:30

भजनरत्न कवी नारायण अग्रवाल तथा ‘दास नारायण’ लिखित ‘गोपाला को समर्पण’ भजन अल्बमचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात करण्यात आले.

 Devotion to 'Gopala', decorated by devotional songs, reviews of songs performed by devotional songs | भक्तिरसांनी सजलेला ‘गोपाला को समर्पण’, भक्तिपर रचलेल्या गाण्यांच्या कार्याचा आढावा

भक्तिरसांनी सजलेला ‘गोपाला को समर्पण’, भक्तिपर रचलेल्या गाण्यांच्या कार्याचा आढावा

googlenewsNext

भजनरत्न कवी नारायण अग्रवाल तथा ‘दास नारायण’ लिखित ‘गोपाला को समर्पण’ भजन अल्बमचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात करण्यात आले. १३ आॅगस्ट रोजी जुहू येथील इस्कॉन मंदिरातही अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह भूषण लखांडरी, गायक शंकर महादेवन, गायक अनू मलिक, गायक सुरेश वाडकर, विवेक प्रकाश आणि जी. सुरदास उपस्थित होते. याच अल्बम प्रकाशनाच्या निमित्तासह त्यांनी भक्तिपर रचलेल्या गाण्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, भजनरत्न कवी नारायण अग्रवाल यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला खास संवाद वाचकांसाठी.

‘गोपाला को समर्पण’ चे वैशिष्ट्य काय आहे?
‘गोपाला को समर्पण’ हा भजन अल्बम म्हणजे, केवळ आठ भजनांची सीडी नाही, तर ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रति असलेली भक्तिपर श्रद्धा आहे. अल्बमधील गाण्यातून ही भक्तिपर श्रद्धा प्रकट झाली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हेमा मालिनी या व्यावसायिक गायिका नाहीत, त्यामुळे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
‘गोपाला को समर्पण’साठी हेमा मालिनी यांचे सहकार्य लाभले?
खासदार असलेल्या हेमा मालिनी या श्रेष्ठ शास्रीय नृत्यांगना आहेत, शिवाय मनुष्य भावनांप्रती त्यांना आदर आहे. त्या संवेदनशील आहेत. संवेदनांना अभिव्यक्त करणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. खासदार असतानाच त्या सामाजिक कार्यही करत आहेत. आणि आता त्या श्रीकृष्णाला समर्पित अशा ‘दासी हेमा’देखील झाल्या आहेत.
शास्त्रीय गायक आणि संगीतकारांचे सहकार्य लाभले?
‘गोपाला को समर्पण’ या अल्बममध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मापासून, राधाराणी विरह आणि द्वारकानाथ प्रवेशापर्यंतच्या भावपूर्ण भजनांचा समावेश आहे. याच भजनांचे लिखाण श्रीकृष्णाच्या कृपेने करण्यात आले आहे. आठ भक्तिपदांची रचना ज्येष्ठ-श्रेष्ठ अशा चार शास्त्रीय गायक आणि संगीतकारांनी केली आहे. यात संगीत मार्तंड पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित राजन साजन मिश्रा यांचा समावेश आहे.
ज्येष्ठ-श्रेष्ठांच्या सानिध्याबद्दल काय सांगाल?
भारत सरकारने ‘भजन रत्न’ असा माझा गौरव केला आहे. उत्साद बिस्मिला खाँ यांनीही भजनांना साथ दिली असून, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी अमोणकर, अनुप जलोटा, जगजित सिंग यांच्यासारख्या दिग्गजांचीही माझ्या भजनांना साथ लाभली आहे. सरस्वती पुरस्कार, भजन रत्न, कवी श्रेष्ठ, कवी शिरोमणी यासारख्या पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आले असून, ज्येष्ठ अभिनेत अमिताभ बच्चन यांच्या हस्तेही गौरविण्यात आले आहे. प्रबुद्ध भक्ती कला सर्वोच्च सन्मान, राष्ट्रीय महामंडळेश्वर सन्मान यासारख्या पुरस्कारांसह तीन राष्ट्रपतींसह चार पंतप्रधानांच्या हस्तेही मला गौरविण्यात आले आहे.
कुटुंबाबद्दल काय सांगाल?
अल्लाहाबादमधील एका संस्कृतीच्या आणि आध्यात्मिकरीत्या प्रतिष्ठित कुटुंबात माझा जन्म झाला. वडील सोने आणि चांदीचे व्यापारी होते. दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आश्वासक मित्र होते. मी संगीत, क्रीडा, चित्रकला, साहित्य, खेळ, सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
श्रोत्यांना काय संदेश द्याल?
‘पलना झुलै नंदलाल’ आणि ‘नयनो की तुम ज्योत बने हो’ ही दोन पदे हेमा मालिनी यांना अधिक आवडली असून, सर्व भक्तिपद भक्त आणि श्रोत्यांना आवडतील, अशी आशा आहे. पाचशेहून अधिक भजन लिहिले असून, शंभरहून अधिक भजन अल्बमचे प्रकाशन करण्यात आले आहे. दरम्यान, मी ‘बेगर फ्री इंडिया’ ही चळवळ हाती घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांच्याकडे या चळवळीचे महत्त्व विषद केले आहे. बंजर जमीन म्हणजे पडीक जमीन हाती घेत, त्यावर एखादे ‘टाउन’ वसवित, तिथे पायाभूत सेवा-सुविधा देणे, हा चळवळीचा प्रमुख उद्देश आहे.

Web Title:  Devotion to 'Gopala', decorated by devotional songs, reviews of songs performed by devotional songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.