देवयानी खोब्रागडे - जोड
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:14+5:302014-12-20T22:27:14+5:30
आदर्श प्रकरणात आपले व आपले वडील उत्तमराव खोब्रागडे यांचे नाव आले त्याबद्दल विचारले असता देवयानी यांनी आदर्श प्रकरणाची चौकशी सीबीआयने बंद केली आहे. माझा किंवा माझ्या वडिलांचा कुठलाही फ्लॅट आदर्शमध्ये नाही. मुंबईत सोसायटीत आमची मेंबरशिप आहे, ओनरशिप नाही, असे खोब्रागडे यांनी सांगितले. भविष्यात राजकारणात प्रवेश कराल का, असे विचारले असता त्यांनी असा कुठलाच विचार नाही. मला विदेश सेवेतच रुची आहे, असे त्यांनी सांगितले.
Next
अ ोला - दापुरा येथे अवैध देशी दारूची पाच दुकाने असून, यामुळे गावातील अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता असल्याने येथील महिलांसह ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या कार्यालयावर धडक देऊन गावातील देशी दारूची विक्री बंद करण्याची मागणी केली. यासोबतच बोरगाव मंजू पोलिसांची चौकशी करण्याचीही मागणी या महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या दापुरा येथे पाच अवैध देशी दारूचे व एका ठिकाणावरून गावरान दारूची विक्री करण्यात येत आहे. याबाबत येथील महिलांनी वारंवार बोरगाव मंज्ू पोलिसांना निवेदन देऊन अवैध दारूची विक्री बंद करण्याची मागणी केली. मात्र, बोरगाव मंजू पोलिसांनी याकडे वारंवार अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार व या परिसरातील बिट जमादार यांची चौकशी करून देशी दारूची अवैध विक्री बंद करण्याकडे कानाडोळा का केला, याची माहिती पोलीस अधीक्षकांनी घ्यावी व दोषींवर कारवाई करण्याची मागणीही या महिलांनी केली आहे. या दारू विक्रीमुळे गरीब महिलांचे संसार उघड्यावर येण्याचा धोका असल्याने या गावातील दारू विक्री तातडीने बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी पदमा माणिक डोंगरे, बबिता डोंगरे, वंदना डोंगरे, संगीता डोंगरे, सविता डोंगरे, बुद्धकला जामनिक, शारदा डोंगरे, अनिता डोंगरे, कल्पना डोंगरे, सिंधू डोंगरे, कुसुम डोंगरे, रमाबाई डोंगरे, संगीता गावंडे, गौकर्णा सोळंके, कोकीळा डोंगरे, उषा डोंगरे, ललिता डोंगरे, चंदा राऊत, सोनू इंगळे, सविता डोंगरे, विमला डोंगरे, मीरा इंगळे यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.फोटो - 21 सीटीसीएल 15