DGCAची कारवाई, 'स्पाइसजेट'च्या पायलटवर चार महिन्यांसाठी निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:57 PM2019-09-30T15:57:39+5:302019-09-30T15:57:51+5:30
एकाच रनवेवर दोन विमानांचे लँडिंग करण्याची परिस्थिती उद्भवली होती.
नवी दिल्ली : स्पाइसजेट विमान कंपनीच्या दोन पायलटवर कारवाई करण्यात आली आहे. 13 जून रोजी हैदराबादहून जयपूरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून या विमानाच्या दोन पायलटवर चार महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Directorate General of Civil Aviation (DGCA) has suspended two pilots of SpiceJet for four months over air pressurisation failure in the aircraft, when the flight was scheduled from Hyderabad to Jaipur on June 13. (File pic) pic.twitter.com/6Rdimj3SBV
— ANI (@ANI) September 30, 2019
याआधी 31 ऑगस्ट रोजी एअर ट्रॅफिक कंट्रोलचे (ATC) निर्देश व्यवस्थित ऐकले नसल्यामुळे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने स्पाइसजेटच्या एका पायलटला तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते. त्यावेळी फर्स्ट ऑफिसर पायलटने आपल्या पायलट इन कमांडला (PIC) एअर ट्रॅफिक कंट्रोलचे निर्देश व्यवस्थित सांगितले नाहीत. त्यामुळे मुंबई विमानतळावर एकाच रनवेवर दोन विमानांचे लँडिंग करण्याची परिस्थिती उद्भवली होती.