धरणसाठा 14 टीएमसी वर पुणेकरांना दिलासा : वर्षभराचे पाणी साठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:53+5:302015-08-03T22:26:53+5:30

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण साखळीमधील धरणांचा पाणीसाठा 14 टीएमसीवर ( दशलक्ष घनमीटरवर ) पोहचला आहे. हा पाणीसाठा जवळपास 47 टक्के असून या पाणीसाठयामध्ये शहराची वर्षभराची पाणी समस्या तात्पुरत्या स्वरूपात सुटली असून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या चारही धरणांच्या पाणलोट पावसाने विश्रांती घेतली असली तरी, मागील आठवडयापासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठयात वाढ सुरूच असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

Dhanansagar 14 TMC on Pune: Relief for the year: Water storage of the year | धरणसाठा 14 टीएमसी वर पुणेकरांना दिलासा : वर्षभराचे पाणी साठले

धरणसाठा 14 टीएमसी वर पुणेकरांना दिलासा : वर्षभराचे पाणी साठले

googlenewsNext
णे : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण साखळीमधील धरणांचा पाणीसाठा 14 टीएमसीवर ( दशलक्ष घनमीटरवर ) पोहचला आहे. हा पाणीसाठा जवळपास 47 टक्के असून या पाणीसाठयामध्ये शहराची वर्षभराची पाणी समस्या तात्पुरत्या स्वरूपात सुटली असून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या चारही धरणांच्या पाणलोट पावसाने विश्रांती घेतली असली तरी, मागील आठवडयापासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठयात वाढ सुरूच असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या दहा दिवसांपासून या चारही धरणा़ंच्या पाणलोट क्षेत्रीत चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे 20 जुलै पासून सुरू झालेल्या या पावसाने पाणीसाठा दुपटीने वाढला असून 7 टीएमसी 14 टीएमसीवर पोहचला आहे. शहराला दरमहा सुमारे 1.25 टीएमसी पाणी लगते. तर या पाणीसाठयात 10 टक्के कपात केल्यास 1 टीएमसी पाण्याची दरमहा आवश्यकता आहे. त्यानुसार, हे पाणी शहराला एकवर्ष पुरेल एवढे असल्याने तूर्तास धरणांमध्ये साठलेला हा पाणीसाठा पुढील वर्षभर शहराची तहान भागविण्यासाठी पुरेसा आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या दुस-या आठवडयातही चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतीसाठीच्या पाण्याचीही समस्या सुटण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
===========
पानशेत 61 टक्के भरले
या चारही धरणांमध्ये सोमवारी सांयकाळ पर्यंत 13.5 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये 19 टीएमसी पाणीसाठा होता. या वर्षीच्या पाणीसाठयात सर्वाधिक 6.56 टीएमसी पाणी पानशेत धरणांमध्ये आहे.तर
वरसगाव धरणामध्ये 5.56 टीएमसी पाणीसाठा आहे. तर टेमघर धरणामध्ये 1.20 टीएमसी पाणी असून खडकवासला धरणात 0.62 टीएमसी पाणी असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. तर आज दिवसभर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अवघा 8 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली.
==================
धरणसाठा आणि आजचा पाऊस
धरणाचे नाव पाणीसठा ( टीएमसी)
खडकवासला 0.59
पानशेत 6,58
वरसगाव 5.58
टेमघर 1.21
================================
एकूण 13.95
=========================

Web Title: Dhanansagar 14 TMC on Pune: Relief for the year: Water storage of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.