धनकवडीचा उडडणपूल विद्युत रोषणाईने झगमगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2016 01:50 AM2016-06-08T01:50:29+5:302016-06-08T01:50:29+5:30
पुणे : धनकवडी येथील उडडणपुलावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून संगणीकृत विद्युतीकरण करण्याचे काम पूर्ण झाले वेगवेगळया रंगातील विद्युत रोषणाईने उडडणपूल झगमगणार आहे. मंगळवारी या विद्युत रोषणाईची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून असून येत्या आठ दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईचे उद्घाटन केले जाणार आहे.
Next
प णे : धनकवडी येथील उडडणपुलावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून संगणीकृत विद्युतीकरण करण्याचे काम पूर्ण झाले वेगवेगळया रंगातील विद्युत रोषणाईने उडडणपूल झगमगणार आहे. मंगळवारी या विद्युत रोषणाईची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून असून येत्या आठ दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईचे उद्घाटन केले जाणार आहे.माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून धनकवडीच्या उडडणपुलावर १ कोटी ३२ लाख रूपये खर्च करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आरजीबी तंत्रज्ञान वापरून संपूर्ण संगणीकृत अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे. संगणकाच्या मदतीने विद्युत रोषणाईचे रंग बदलता येणार आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी तिरंगा, शिवजयंतीला भगवा, आंबेडकर जयंतील निळा अशा वेगवेगळया रंगांमध्ये उडडणपुलाचे दर्शन पुणेकरांना वर्षभर होणार आहे.