माघारीसाठी उमेदवारांवर धनलक्ष्मीचा वर्षाव १० लाखांपासून बोली : सुरेश चौधरी यांची अखेरपर्यंत मनधरणी, पटेलांचा विश्राम बंगला बनला हालचालींचे केंद्र

By admin | Published: November 5, 2016 10:52 PM2016-11-05T22:52:27+5:302016-11-05T22:52:27+5:30

जळगाव : विधानपरिषद निवडणुकीत माघार घेण्यासंबंधी सर्वसाधारण उमेदवारांना माघारीसाठी १० लाखांपासून बोली लावली जात होती. यात अनेक उमेदवारांनी कोटींची मागणी केली, यातच बोलणी फिस्कटली. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हरांड्यातही माघारीसंबंधी आमीष दिले जात होते. अनेक उमेदवार आपल्याला बोलावणे येईल म्हणून जिल्हाधिकारी आवारात फिरत होते. त्यात अनेकांचे जमले..., यातच अनेक उमेदवार माघारीची वेळ आल्याने नाराज झाले. त्यात शिवसेना पुरस्कृत उमेदवार सुरेश चौधरी यांची माघारीसंबंधी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना विनवणी करावी लागली.

Dhanlakshmi rain showers for candidates to withdraw from BPL: Suresh Chaudhary's mantra, till finally | माघारीसाठी उमेदवारांवर धनलक्ष्मीचा वर्षाव १० लाखांपासून बोली : सुरेश चौधरी यांची अखेरपर्यंत मनधरणी, पटेलांचा विश्राम बंगला बनला हालचालींचे केंद्र

माघारीसाठी उमेदवारांवर धनलक्ष्मीचा वर्षाव १० लाखांपासून बोली : सुरेश चौधरी यांची अखेरपर्यंत मनधरणी, पटेलांचा विश्राम बंगला बनला हालचालींचे केंद्र

Next
गाव : विधानपरिषद निवडणुकीत माघार घेण्यासंबंधी सर्वसाधारण उमेदवारांना माघारीसाठी १० लाखांपासून बोली लावली जात होती. यात अनेक उमेदवारांनी कोटींची मागणी केली, यातच बोलणी फिस्कटली. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हरांड्यातही माघारीसंबंधी आमीष दिले जात होते. अनेक उमेदवार आपल्याला बोलावणे येईल म्हणून जिल्हाधिकारी आवारात फिरत होते. त्यात अनेकांचे जमले..., यातच अनेक उमेदवार माघारीची वेळ आल्याने नाराज झाले. त्यात शिवसेना पुरस्कृत उमेदवार सुरेश चौधरी यांची माघारीसंबंधी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना विनवणी करावी लागली.
आपल्याकडे किती संख्याबळ किंवा नगरसेवक आहेत याची माहिती काही उमेदवारांनी प्रमुख पक्षाच्या नेत्यांकडे पोहोचविली व बोलणी सुरू केली. त्यासाठी विविध तालुक्यांमधील नगरसेवक तर जळगावात सकाळपासूनच दाखल झाले होते. किती मिळतात याबाबत अनेकांना उत्सुकता होती. त्यात अनेकांचे फावले...

विश्राम बंगल्यावर गर्दी
भाजपाचे उमेदवार चंदूलाल पटेल व माजी नगरसेवक यशवंत पटेल यांच्या शहरातील ओंकारेश्वर मंदिरानजीकच्या जयनगरमधील विश्राम, ७८ या बंगल्यावर भाजपाचे अनेक नेते सकाळपासून तळ ठोकून होते. त्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ.गुरुमुख जगवानी, सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, श्रीकांत खटोड, श्रीकाम खटोड, किशोर काळकर, भगत बालाणी, अतुल हाडा, अमर जैन आदींचा समावेश होता. जलसंपदामंत्री महाजन हे निवडणुकीसंबंधी सतत मोबाईलवर बोलत होते. मध्येच ते बंगल्यात जायचे..., चंदूलाल पटेल यांच्यासह त्यांचे बंधू यशवंत पटेल निवडणुकीसंबंधीच्या कार्यवाहीत व्यस्त होते. या बंगल्यावरून भाजपाच्या सर्व हालचाली सुरू होत्या.

अनेक नेत्यांची एकामागून एक हजेरी
पटेल यांच्या विश्राम बंगल्यावर १.१७ वाजता नगरसेवक कैलास सोनवणे, अश्विन सोनवणे हे दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे आनंदराव रायसिंग हेदेखील आले व ते कुणाशीही चर्चा न करता थेट बंगल्यात गेले. बंगल्यात काय चर्चा होत होती याचा तपशील मात्र बाहेर येत नव्हता. १.३० वाजता आमदार हरिभाऊ जावळे दाखल झाले. ते लागलीच कैलास सोनवणे, गिरीश महाजन यांच्याशी चर्चेत व्यस्त झाले.
हाडा १० अर्ज घेऊन पटेलांकडे
माघारीसंबंधीची बोलणी पटेल यांच्या विश्राम बंगल्यावरून सुरू असतानाच अतुल हाडा यांनी १२.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातून माघारीसाठीचे १० अर्ज घेतले व ते थेट यशवंत पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. श्रीकांत खटोड यांनीही आपला अर्ज स्वत: आणल्याची नोंद होती.

Web Title: Dhanlakshmi rain showers for candidates to withdraw from BPL: Suresh Chaudhary's mantra, till finally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.