जबरदस्त! 3 सरकारी नोकऱ्या सोडून 'तो' दूध विकायला लागला; आता करतो लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:03 PM2023-02-22T18:03:19+5:302023-02-22T18:04:36+5:30

धनराज नोकरीत असताना जेवढे पैसे कमवत होता त्यापेक्षा जास्त पैसे आता कमावतो आहे. इतरांनाही रोजगार देतो.

dhanraj lavvansh who left 3 government jobs started dairy in aklera jhalawar rajasthan | जबरदस्त! 3 सरकारी नोकऱ्या सोडून 'तो' दूध विकायला लागला; आता करतो लाखोंची कमाई

जबरदस्त! 3 सरकारी नोकऱ्या सोडून 'तो' दूध विकायला लागला; आता करतो लाखोंची कमाई

googlenewsNext

एकदा सरकारी नोकरी लागली की, अनेकदा लोक त्यातच आयुष्य घालवतात. सरकारी नोकरी सोडून आपल्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्याची हिंमत करत नाहीत.  मात्र धनराज लववंशची गोष्ट वेगळी आहे. धनराज लववंशी हा राजस्थानचा रहिवासी असून त्याने तीनदा सरकारी नोकरी नाकारली आहे. आता धनराज नोकरीत असताना जेवढे पैसे कमवत होता त्यापेक्षा जास्त पैसे आता कमावतो आहे. इतरांनाही रोजगार देतो.

वन इंडिया हिंदीशी संवाद साधताना, 29 वर्षीय धनराज लववंशी याने आपली यशोगाथा सांगितली. गेल्या चार वर्षांपासून तो झालावाड जिल्ह्यातील अकलेरा येथे एक डेअरी चालवत आहे. तो गांडुळ खत देखील तयार करत आहे आणि या वर्षी एप्रिलपर्यंत नर्सरी उघडणार आहे. यासोबतच त्यांचे एक फार्म हाऊस असून तेथे तो भाजीपाला पिकवतो. दुग्धव्यवसाय, गांडूळ खत आणि शेतीचा सर्व खर्च उचलून दरमहा सुमारे दीड लाख रुपयांची बचत होत असल्याचं धनराजने म्हटलं आहे. 

म्हशीचे दूध हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यांच्याकडे हरियाणातील मुर्रा जातीच्या 23 म्हशी आहेत. त्यांचे शाखा व्यवस्थापक, क्षेत्र अधिकारी आणि डिलिव्हरी बॉय यांच्या मदतीने घरोघरी दूध पोहोचवले जात आहे. धनराजची डेअरी दररोज 150 लिटर म्हशीचे दूध विकत आहे, दुग्धशाळेत दूध पॅकेटमध्ये भरून तयार केले जाते. धनराजच्या डेअरीतून दूध घेण्यासाठी लोकांना सहा महिने अगोदर बुकिंग करावे लागते. धनराजच्या म्हशींची किंमत 57 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत आहे.

धनराजने बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर बीएसटीसीचा कोर्सही केला. 2018 मध्ये, प्रथमच अकेलेरा ACJM न्यायालयात लिपिक श्रेणी II वर सरकारी नोकरी करायला सुरुवात केली. 14 हजार 600 रुपयांत वर्षभर काम केले. प्रोबेशन कालावधीतच नोकरी सोडली. त्यानंतर तहसीलमध्ये एलडीसीमध्ये सामील झाला नाही. 2019 मध्ये शिक्षक म्हणून तिसरी नोकरी मिळाली. 2022 मध्ये त्याने 37 हजार रुपये महिना पगार असलेली शिक्षकाची नोकरी सोडली आणि हा व्यवसाय सुरू केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: dhanraj lavvansh who left 3 government jobs started dairy in aklera jhalawar rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.