"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:03 PM2024-10-31T16:03:33+5:302024-10-31T16:04:47+5:30

यावेळी कल्याण यांनी एका हिंदू मुलाच्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना एका पोस्टमध्ये लिहित, "पाकिस्तानातील एका हिंदू मुलाचे हे गीत फाळणीच्या तीव्र वेदनेसह पुन्हा एकदा भारतासोबत एकरूप होण्याची लालसा दर्शवते," असे म्हटले आहे.

Dharma Ki Punarrasthana ho What did Pawan Kalyan say to the Hindus of Pakistan, Bangladesh, Afghanistan on the occasion of Diwali | "धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण

"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कल्याण यांनी गुरुवारी (31 ऑक्टोबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, असे  त्यांनी लिहिले आहे.

पवन कल्याण यांनी प्रामुख्याने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, भगवान श्री राम तुम्हाला या स्थितीत शक्ती आणि धैर्य देवो. भारतात आम्ही सर्वजण आपल्या सुरक्षिततेसाठी आणि स्थिरतेसाठी कामना करतो आणि आपण आणच्या प्रार्थनेत सामील आहात. तसेच, पाकिस्तान आणि बांगलादेशात छळ होत असलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आणि मूलभूत हक्कांसाठी जागतिक समुदाय आणि जागतिक नेते त्यांच्याशी संपर्क साधतील, अशी आशाही जनसेनेच्या नेत्याने व्यक्त केली आहे.

पाकिस्तानातील हिंदूंसाठी प्रार्थना -
उपमुख्यमंत्री पवन कल्याण पुढे म्हणाले, "आज दिवाळीच्या दिवशी आपण सर्वजण बांगलादेश आणि पाकिस्तानात अत्याचार होत असलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करूया. त्यांच्या भूमीवर धर्माची पुनर्स्थापना व्हावी." यावेळी कल्याण यांनी एका हिंदू मुलाच्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना एका पोस्टमध्ये लिहित, "पाकिस्तानातील एका हिंदू मुलाचे हे गीत फाळणीच्या तीव्र वेदनेसह पुन्हा एकदा भारतासोबत एकरूप होण्याची लालसा दर्शवते," असे म्हटले आहे.

असं आहे गीत - 
कल्याण यांनी लिहिले आहे, पाकिस्तानात हा हिंदू मुलगा जे सिंधी गीत गात आहे, ते आहे 'अलबेलो इंडिया'. यात 'माझा हिंदू शेजारी अलबेलो भारतात जाण्यासाठी रवाना होत आहे. तो या शुक्रवारी (1 नोव्हेंबर) ट्रेनमध्ये बसेल आणि पुन्हा कधीच पाकिस्तानात परतणार नाही. 

यावेळी पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशातील जनतेलाही दिवाळीच्या सुभेच्छा दिल्या आणि हा सण त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो असे म्हटले आहे.
 

Web Title: Dharma Ki Punarrasthana ho What did Pawan Kalyan say to the Hindus of Pakistan, Bangladesh, Afghanistan on the occasion of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.