आठ विहिरींमधील गाळ काढला धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम : पुढील दोन दिवस आणखी मोहीम, कुसुंबा तलावातील गाळही काढणार

By admin | Published: May 11, 2016 12:26 AM2016-05-11T00:26:36+5:302016-05-11T00:26:36+5:30

जळगाव- धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण भागातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमातून मंगळवारी म्हसावद, लोहारा ता.पाचोरा येथे प्रत्येकी एक, एरंडोलातील चार आणि कासोदा येथील दोन विहिरींमधील गाळ काढण्यात आला.

Dharmadhikari Pratishthan's initiative to remove sludge of eight wells: Next two days, another campaign, Kusumba lake drain | आठ विहिरींमधील गाळ काढला धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम : पुढील दोन दिवस आणखी मोहीम, कुसुंबा तलावातील गाळही काढणार

आठ विहिरींमधील गाळ काढला धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम : पुढील दोन दिवस आणखी मोहीम, कुसुंबा तलावातील गाळही काढणार

Next
गाव- धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण भागातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमातून मंगळवारी म्हसावद, लोहारा ता.पाचोरा येथे प्रत्येकी एक, एरंडोलातील चार आणि कासोदा येथील दोन विहिरींमधील गाळ काढण्यात आला.
पैकी लोहारा येथील विहिरीमध्ये बर्‍यापैकी पाणीसाठा होत असून, त्यात मोटरपंपही बसविण्यात आला आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच ११ व १२ रोजी हा उपक्रम सुरू राहणार असून, आणखी २४ विहिरींमधील गाळ काढला जाणार आहे. म्हसावद येथील बस स्टॅण्डजवळील विहिरीमधून गाळ काढण्याचे काम करण्यात आले.
११ रोजी कुसुंबा, नशिराबाद, तरसोद व शहापूर व सोनारी ता.जामनेर येथील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढला जाईल. तर १२ रोजी जामनेर व जळगाव शहरातील आठ विहिरींमधील गाळ काढला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे रामभाऊ पोळ यांनी दिली.

दोन हजार कार्यकर्ते
या गाळ काढण्याच्या मोहिमेत प्रतिष्ठानचे दोन हजार कार्यकर्ते काम करीत आहेत. पुढील आठवड्यामध्ये कुसुंबा येथील तलावातून गाळ काढला जाणार आहे. तसेच जिल्हाभरातील ५०० विहिरींच्या जलपुनर्भरणासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे पोळ म्हणाले.

गाळ काढल्यानंतर ग्रा.पं.कडे कार्यवाही
गाळ काढल्यानंतर संबंधित गावातील ग्रा.पं. किंवा पालिकेला विहिरीत मोटारपंप बसविणे व इतर कार्यवाही करायची आहे. प्रतिष्ठानतर्फे फक्त विहिरींमधील गाळ काढण्याची मोहीम राबविली जात आहे.

Web Title: Dharmadhikari Pratishthan's initiative to remove sludge of eight wells: Next two days, another campaign, Kusumba lake drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.