Video - "माझ्या नवऱ्याचं कोणासोबत अफेअर आहे का?"; महिलेच्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 11:52 AM2023-03-08T11:52:32+5:302023-03-08T11:56:27+5:30
Dhirendra Shastri : पंडित शास्त्री यांनी महिलेच्या पतीचे कोणासोबत अफेअर आहे की नाही याचं उत्तर दिलं आहे.
दोन व्यक्तींचे प्रेमसंबंध यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. जर दोन्हीँपैकी एकाने दुसर्यावर संशय घेतला तर त्यांचे नाते वाचवणं फार कठीण होऊन बसतं. अशाच समस्येचा सामना करत असलेल्या एका महिलेने बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे याबाबत विचारणा केली. व्हायरल व्हिडिओमध्ये पंडित शास्त्री यांनी महिलेच्या पतीचे कोणासोबत अफेअर आहे की नाही याचं उत्तर दिलं आहे.
एक महिला बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात आली आहे. महिलेने सांगितलं की, ती तिच्या पतीबद्दल एक तक्रार घेऊन तिथं आली आहे. तिच्या पतीचं लक्ष कामात नीट लागत नाही. तिच्या नवऱ्यावर कोणीतरी काही जादू केली आहे का? असा प्रश्न तिने विचारला होता. यावर धीरेंद्र शास्त्री त्या महिलेला एक चिठ्ठी वाचून दाखवतात. त्यात महिला आपल्या पतीच्या वागण्यामुळे चिंतेत असल्याचं लिहिलेलं असतं. तिचा नवरा गप्प राहतो आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असंही त्यात लिहिलेलं आहे.
महिलेचं म्हणणं ऐकून घेतल्यावर बाबा धीरेंद्र दावा करतात की, ती महिला प्रत्यक्षात तिच्या पतीचे अफेअर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तिथे आली आहे. ती महिलाही हसत त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देते. महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री म्हणतात की, दोन्ही बाजू चुकीच्या आहेत. याचा अर्थ असा समोर येत आहे की तिचा नवरा चुकीच्या मार्गावर जात आहे, परंतु त्याने अद्याप कोणतीही चूक केलेली नाही. तसेच, महिलेचा संशयी स्वभाव ही तिची चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"