धोनीने २०१९ विश्वचषकानंतरच निवृत्ती घ्यायला हवी होती - अख्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 05:51 AM2020-04-13T05:51:08+5:302020-04-13T05:52:01+5:30
अख्तर याने सांगितले की, या खेळाडूमध्ये पूर्ण क्षमतेने क्रिकेटची सेवा केली आहे. त्याने पूर्ण सन्मानाने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. मला माहीत नाही की हे एवढे का ताणले जात आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याच्या मते भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकानंतर निवृत्ती स्वीकारायला हवी होती. मात्र त्याने अजून हा निर्णय का प्रलंबित ठेवला आहे. याची माहिती नसल्याचेही अख्तर म्हणाला.
अख्तर याने सांगितले की, या खेळाडूमध्ये पूर्ण क्षमतेने क्रिकेटची सेवा केली आहे. त्याने पूर्ण सन्मानाने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. मला माहीत नाही की हे एवढे का ताणले जात आहे. त्याने विश्वचषकानंतर निवृत्ती घ्यायला हवी होती. जर मी त्याच्या जागी असतो तर निवृत्ती घेतली असती. मी लहान प्रारूपात अजून काही काळ खेळू शकलो असतो. मात्र २०११ च्या विश्वचषकानंतर लगेचच निवृत्ती घेतली असती.’
धोनीने गेल्या वर्षी जुलैनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अख्तर म्हणाला की,‘एक देश म्हणून धोनीला सन्मानाने निवृत्ती द्यावी. त्याने भारतासाठी विश्वचषक जिंकला आहे. भारताकडून शानदार खेळ केला आहे. न्यूझीलंड विरोधातील सामन्यात तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच वेळी त्याने निवृत्ती घ्यायला हवी होती. ’ अख्तरने म्हटले की, ‘भारताने २०१३ नंतर एकही मोठी आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. विराटला संघात मधल्या फळीत सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूची गरज आहे.’