विष्णूरुपातल्या धोनीला सर्वोच्च नायालयाचा दिलासा
By admin | Published: January 29, 2016 05:28 PM2016-01-29T17:28:04+5:302016-01-29T17:33:17+5:30
भगवान विष्णूच्या रूपात छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर भावाना दुखावल्या म्हणून दाखल केलेल्या खटल्याला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - एका मासिकाच्या मुखपृष्ठावर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचे भगवान विष्णूच्या रूपात छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर भाविकांच्या भावना दुखावल्यामुळे त्याच्या विरुद्ध आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्हा येथील एका स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे धोनीला दिलासा मिळाला आहे.
२०१३ मधील संबंधित छायाचित्रात धोनीच्या हातात खाण्याच्या विविध वस्तू आहेत. यामध्ये बुटाचा समावेश होता. छायाचित्रामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी तक्रार दाखल केली होती. स्थानिक विश्व हिंदू परिषदचे श्याम सुंदर यांनी याचिका दाखल केली होती.
दरम्यान, भगवान विष्णूच्या रूपातील माझे छायाचित्र काढले नव्हते. तसेच त्या छायाचित्रासाठी मासिकाकडून कोणतेही पैसे घेतले नव्हते, असे धोनीने न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१५ मध्ये धोनीविरोधातील गुन्हेगारी कारवाईची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते.