मंदिरात धोती-कुर्त्यातील पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:22 AM2018-03-28T03:22:27+5:302018-03-28T03:22:27+5:30
येथील जगप्रसिद्ध काशी-विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात गर्दीच्या नियंत्रणासाठी नेमलेल्या पोलिसांनी आता नेहमीच्या
वाराणसी : येथील जगप्रसिद्ध काशी-विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात गर्दीच्या नियंत्रणासाठी नेमलेल्या पोलिसांनी आता नेहमीच्या गणवेशाऐवजी धोतर आणि कुर्ता असा वेश परिधान करायला सुरुवात केली आहे. केशरी कुडता आणि पांढरे धोतर नेसलेले तीन पोलीस
मंदिराच्या गाभा-यात सोमवारपासून ड्युटीवर रुजू झाले.
या मंदिरात दररोज हजारो भाविकांची गर्दी होते. मंदिर परिसर आणि अगदी गाभाºयातही गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलीस पूर्वीपासूनच असले, तरी गाभाºयात नागरी वेशातील पोलीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या वेशांतरामागचे कारण स्पष्ट करताना वाराणसीचे पोलीस महानिरीक्षक दीपक रतन
म्हणाले की, अनेक श्रद्धाळू भाविकांना गणवेशधारी पोलिसांच्या
उपस्थितीत पूजा-प्रार्थना करताना दडपण येते.
पुजाºयांनाही ही अडचण जाणते, अशा तक्रारी होत्या. भाविकांच्या श्रद्धेचा आदर करण्यासाठी हा
बदल करण्यात आला. ते म्हणाले की, असे करण्याने नियमाचे उल्लंघनही होत नाही. एरवी व्हीआयपी
सुरक्षेसह अन्य विशिष्ठ कामांवर नेमलेले पोलीसही साध्या वेशात असतातच.
आचरणाचेही प्रशिक्षण
गाभाºयात नेमल्या जाणाºया पोलिसांना साध्या वेशात ड्युटीवर
या असे सांगितले होते. धोती व कुडता ही त्यांची पसंती आहे,
असेही रतन म्हणाले. या ठिकाणाचे
पावित्र्य लक्षात घेऊन कसे आचरण करावे, याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात येत आहे, असेही रतन
यांनी सांगितले.