धुळे पोलिसांची दीपक गुप्तांना नोटीस
By admin | Published: January 7, 2016 09:37 PM2016-01-07T21:37:39+5:302016-01-07T21:37:39+5:30
जळगाव: धुळे शहरातील आझाद नगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ाचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले जाणार असल्याने या गुन्ातील आरोपी दीपक गुप्ता यांना गुरुवारी आझाद नगर पोलीस स्टेशनच्यावतीने हजर राहण्याची सीआरपीसी ४१(१) नोटीस बजावण्यात आली. १५ मार्च २०१६ रोजी गुप्ता यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.
Next
ज गाव: धुळे शहरातील आझाद नगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ाचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले जाणार असल्याने या गुन्ातील आरोपी दीपक गुप्ता यांना गुरुवारी आझाद नगर पोलीस स्टेशनच्यावतीने हजर राहण्याची सीआरपीसी ४१(१) नोटीस बजावण्यात आली. १५ मार्च २०१६ रोजी गुप्ता यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या फिर्यादीवरुन गुप्ता यांच्याविरुध्द आझाद नगर पोलीस स्टेशनला भाग ६ गु.रन.७५/२०१५ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ चे सह भादवि कलम ५०७ अन्वये २१ नोव्हेंबर २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांच्या मोबाईलवरून गोटे तसेच अन्य लोकप्रतिनिधींना धमकी देण्यात आली होती असा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानुसार आमदार अनिल गोटे यांनी स्वत: गुप्ता यांच्याविरुध्द तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी गुप्ता यांना धुळे पोलीस त्यांना जळगावातून घेवून गेले होते. नंतर चौकशी करुन रात्रीच सोडून देण्यात आले होते.पोलीस स्टेशनमध्ये बजावली नोटीसआझाद नगर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पी.एस.ढोले, कर्मचारी मनोहर पाटील व भिकाजी पाटील आदींचे पथक गुरुवारी दुपारी बारा वाजता शहर पोलीस स्टेशनला दाखल झाले. पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. नंतर गुप्ता यांना फोन करुन बोलावून घेण्यात आले. यावेळी गुप्ता यांच्यासोबत गजानन मालपुरे, शिवराम पाटील व ॲड.कुणाल पाटील हेदेखील दाखल झाले होते. नोटीसची प्रक्रीया पार पाडल्यानंतर स्टेशन डायरीला तशी नोंद करण्यात आली.