सर्व आपत्कालीन सेवांसाठी आता डायल करा ११२
By admin | Published: March 29, 2016 03:56 AM2016-03-29T03:56:55+5:302016-03-29T03:56:55+5:30
पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका या आपत्कालीन सेवांसाठी आतापर्यंत देशभर १00, १0१ आणि १0२ या क्रमांकांवर संपर्क साधावा लागत असे. आता मात्र ११२ या एकाच
Next
नवी दिल्ली : पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका या आपत्कालीन सेवांसाठी आतापर्यंत देशभर १00, १0१ आणि १0२ या क्रमांकांवर संपर्क साधावा लागत असे. आता मात्र ११२ या एकाच क्रमांकावर या तिन्ही सेवा उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. टेलिकॉम आॅथोरिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने तिन्ही सेवांसाठी एकच क्रमांक असावा, अशी केलेली शिफारस केंद्रीय मंत्री गटाने मान्य केली.
ही सेवा एका महिन्यात देशभरात अमलात येईल, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत दिली. अमेरिकेत ९११ या एकाच क्रमांकावर या सर्व सेवा उपलब्ध होतात. तसेच आता भारतात शक्य होईल.