कोट्यवधींचं घबाड! तंबाखू व्यावसायिकाच्या घरावर छापा; 2.5 कोटींचं हिऱ्यांचं घड्याळ, दागिने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 12:03 PM2024-03-02T12:03:50+5:302024-03-02T12:04:42+5:30
कारवाईत 4.30 कोटी रुपये रोख आणि 2.5 ते 3 कोटी रुपयांचे दागिने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.
बंशीधर तंबाखू ग्रुपवर आयकर विभागाची मोठी कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आयकर विभागाचे पथक तिसऱ्या दिवशी कंपनीचे मालक के के मिश्रा यांची दिल्लीतील निवासस्थानी चौकशी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के के मिश्रा आपल्या प्रकृतीचे कारण देत अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
छाप्याच्या दुसऱ्या दिवशी, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंशीधर तंबाखू ग्रुपचे प्रमुख के के मिश्रा यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची घड्याळं जप्त केली, ज्यात सुमारे अडीच कोटी रुपयांच्या हिऱ्याने जडलेल्या घड्याळाचा समावेश आहे. एकूण पाच घड्याळं मिळाली आहेत. याचा रिपोर्ट काही दिवसांनी येईल. आयकर विभागाला एकूण पाच घड्याळं मिळाली आहेत ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.
बंशीधर टोबॅको लिमिटेड कंपनीने कोणत्याही कागदपत्रांशिवाय पान मसाला ग्रुपला माल विकला. म्हणजेच कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता पान मसाला ग्रुपने या कंपनीकडून माल घेतला. त्याआधारे या कंपनीकडून माल खरेदी करणाऱ्या पान मसाला ग्रुपवर आयकर विभाग कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त
आतापर्यंत केलेल्या कारवाईत 4.30 कोटी रुपये रोख आणि 2.5 ते 3 कोटी रुपयांचे दागिने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.
इतरत्रही कारवाई सुरूच आहे
यासोबतच या व्यावसायिकाचे गुजरातमधील घर, गुजरातमधील उंझा येथील कारखाना आणि गुंटूरमधील बंशीधर कंपनी ज्या कंपनीतून माल खरेदी करते त्या कंपनीच्या ठिकाणावरही आयकर विभागाच्या पथकांकडून सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत.