मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:17 AM2018-06-08T00:17:08+5:302018-06-08T00:17:08+5:30

आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर बुधवारपासून मोफत व्हाय-फाय सेवा सुरु झाली. अशी सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले.

 Dibrugarh 400th station that provides free Wi-Fi service | मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन

मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन

Next

दिब्रुगड : आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर बुधवारपासून मोफत व्हाय-फाय सेवा सुरु झाली. अशी सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांनी व गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी या ‘रेलवायर’ व्हाय-फाय सेवेसाठी भारतीय रेल्वे व गूगल यांच्यात करार झाल्याची घोषणा केली होती. ही सेवा ४०० स्टेशनवर सुरु करण्याचे कंत्राट गूगलला दिले होते व त्यासाठी यंदाच्या डिसेंबरपर्यंतची मुदत होती. त्याच्या सहा महिने आधीच दिब्रुगड या ४०० व्या स्टेशनवर ही सेवा उपलब्ध केली गेली. या सेवेसाठी रेल्वेने ‘रेलटेल’ नावाची स्वतंत्र उपकंपनी सुरु केली आहे. त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार दररोज सुमारे आठ कोटी लोक या सेवाचा लाभ घेतात. मुळात रेल्वे प्रवाशांच्या लाभासाठी ही सेवा सुरु केली गेली. महानगरांपेक्षा लहान शहरांमध्ये या सेवेचा अधिक उपयोग करून घेतला जात असल्याचेही आढळून आले. दिब्रुगड स्टेशनवर झालेल्या कार्यक्रमात गूगल इंडियाचे के. सुरी म्हणाले की, रेल्वेसोबतचे आमचे कंत्राट पूर्ण झाले, ही सेवा पुढील पाच वर्षे सुरु राहील. आता टेलिकॉम कंपन्यांसोबत भागीदारी करून अशाच प्रकारची सेवा शहरांच्या अन्य सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)

प्रवाशांऐवजी इतरांकडूनच वापर
रेल्वे प्रवाशांखेरीज विद्यार्थी, छोटे व्यापारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकडून होतो वापर
वापरणाºयांपैकी

75%
व्यक्ती १९ ते ३४ या वयोगटातील
अनेकजण
दररोज
एकापेक्षा
अधिक वेळा करतात
लॉग-इन.

देशातील सर्व स्टेशनवर ही सेवा उपलब्ध करून देणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. नव्या भागिदारांशी नवी कंत्राटे करून ‘बी’ व ‘सी’ वर्गातील स्टेशनवर ‘रेलावयर’चे मोफत व्हाय-फाय देण्याचे काम हाती घेतले जाईल.
- के. मनोहर राजा, कार्यकारी संचालक, रेलटेल

Web Title:  Dibrugarh 400th station that provides free Wi-Fi service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :WiFiवायफाय