तुमच्या घरातलं कुत्रं तरी देश सेवेसाठी गेलं का?
By admin | Published: February 6, 2017 05:50 PM2017-02-06T17:50:51+5:302017-02-06T18:14:25+5:30
देशाच्या एकतेसाठी गांधीजी, इंदिरा गांधींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते, तुमच्या घरातून कोण आले, एक कुत्रासुद्धा आला नाही, अशा शब्दात
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - देशाच्या एकतेसाठी गांधीजी, इंदिरा गांधींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते, तुमच्या घरातून कोण आले, एक कुत्रासुद्धा आला नाही, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केंद्र सरकारवर टीका केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज लोकसभेत बोलताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारव ताशेरे ओढले. यादरम्यान, आक्रमकतेच्या भारात खरगे म्हणाले, " गांधीजी, इंदिजा गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे. तुमचे काय? तुमच्या घरचे कुत्रेसुद्धा पुढे आले नाही." भाजपावाले लोकांना भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी देवाच्या नावाचा वापर करतात असा टोला त्यांनी लगावला.
या भाषणादरम्यान खरगेंनी नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक, नरेगा आणि रेल्वेमधील प्रश्नांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सरकार निवडणुकीत केलेल्या घोषणांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.