मोठा खुलासा! कोलकाता प्रकरणातील पुरावे डॉ.संदीप घोष यांना नष्ट करायचे होते? आदेशाची चिठ्ठी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 03:36 PM2024-09-05T15:36:38+5:302024-09-05T15:38:00+5:30

या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा झाला आहे.

Did Dr. Sandeep Ghosh want to destroy the evidence in the Kolkata case? Order letter found | मोठा खुलासा! कोलकाता प्रकरणातील पुरावे डॉ.संदीप घोष यांना नष्ट करायचे होते? आदेशाची चिठ्ठी सापडली

मोठा खुलासा! कोलकाता प्रकरणातील पुरावे डॉ.संदीप घोष यांना नष्ट करायचे होते? आदेशाची चिठ्ठी सापडली

कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात काही दिवसापूर्वी एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा झाला आहे. तत्कालीन प्राचार्य डॉ. संदीप घोष यांचे एक पत्र समोर आले आहे, यामध्ये घोष यांनी पीडब्ल्यूडीला सर्व विभागातील डॉक्टरांच्या खोल्यांची दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्यास सांगितले होते. 

हरियाणात भाजपची डोकेदुखी वाढली; आमदाराचा राजीनामा, खासदाराच्या आईचीही बंडखोरी

संदीप घोष यांच्या या पत्रात अनेक खुलासे झाले आहेत. निवासी डॉक्टरवर ८ ऑगस्टच्या रात्री उशिरा आणि ९ ऑगस्टच्या पहाटे कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. पत्रानुसार, संदीप घोष यांनी हे पत्र घटनेच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच १० ऑगस्ट रोजी पीडब्ल्यूडीला लिहिले होते. पत्रात संदीप घोष यांनी पीडब्ल्यूडीला रुग्णालयातील सर्व विभागांमध्ये कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांच्या खोल्यांची दुरुस्ती करण्यास सांगितले.

या खोल्यांची नूतनीकरण आणि पुनर्बांधणी करण्यासही सांगितले होते. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर आरजी कर हॉस्पिटलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, यामध्ये सेमिनार हॉलजवळील एक खोली पुन्हा बांधली जात होती. मात्र, यावरुन वाद झाल्यानंतर हे काम बंद करण्यात आले. याप्रकरणी रुग्णालयाचे तत्कालीन प्राचार्य संदीप घोष यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित झाले होते.

९ ऑगस्टच्या पहाटे कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर मद्यधुंद आरोपी संजय रॉय याच इमारतीत झोपला होता, त्याला पोलिसांनी अटक केली. सीबीआय सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

सीबीआयने केलेल्या चौकशीत संजय रॉयने अनेक खुलासे केले आहेत. या घटनेनंतर संजय रॉय थेट चौथ् मजल्यावर गेला आणि तिथेच झोपला. १० ऑगस्टला सकाळी उठल्यावर त्याने पुन्हा दारू प्यायली आणि पुन्हा झोपला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलच्या आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये तो दिसला. यामुळे त्याला ताब्यात घेतले. 

Web Title: Did Dr. Sandeep Ghosh want to destroy the evidence in the Kolkata case? Order letter found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.